ठीक मृत्युपूर्वी सुषमा स्वराजांनी फोन करून म्हटलं, 'या आणि तुमच्या Feesचा एक रुपया घेऊन जा'

ठीक मृत्युपूर्वी सुषमा स्वराजांनी फोन करून म्हटलं, 'या आणि तुमच्या Feesचा एक रुपया घेऊन जा'

RIP Sushma Swaraj : सुषमा स्वराज यांनी त्यांना फोन केला आणि म्हटलं, 'तुम्ही उद्या संध्याकाळी 6 वाजता या आणि तुमची एक रुपयाची फी घेऊन जा'.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीत मंगळवारी (6 ऑगस्ट) बिघाड झाल्यानंतर त्यांना तातडीनं एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. स्वराजांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अखेरचा श्वास घेण्यापूर्वी सुषमा स्वराज यांचे आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचा खटला जिंकणारे वरिष्ठ वकील हरिश साळवे यांच्याशी फोनवरून संपर्क झाला होता. साळवेंशी बातचित करताना स्वराज म्हणाल्या, 'तुम्ही उद्या संध्याकाळी 6 वाजता या आणि तुमची एक रुपयाची फी घेऊन जा'.

कुलभूषण प्रकरणात हरिश साळवेंनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात देशाची बाजू मांडली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा तुर्तास टळली. स्वराज यांच्यासोबत शेवटच्या क्षणी झालेल्या या संवादाची आठवण काढून हरिश साळवे प्रचंड भावुक झाले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना हरिश साळवेंनी ही माहिती दिली.

(वाचा :आई-वडिलांचा होता स्पष्ट नकार, तरीदेखील सुषमा स्वराज यांनी केला प्रेमविवाह)

पाकिस्तानच्या कारागृहात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी सुषमा स्वराज संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारपूस करून माहिती घेत असायच्या. यामुळेच परराष्ट्र मंत्रिपद नसतानाही त्यांचा वकील हरिश साळवेंसोबत संपर्क टिकून राहिला होता. ते म्हणाले की,'मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री 8.50 वाजता सुषमा स्वराज यांच्यासोबत माझा फोनवरून संपर्क झाला होता. त्यानंतर त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकून माझं मन सुन्न झालं.  बुधवारी (7 ऑगस्ट) संध्याकाळी त्यांनी मला 6 वाजता एक रुपयाची फी घेण्यासाठी बोलावलं होतं'.

(वाचा : सुषमा स्वराज यांच्याकडे होती 32 कोटींची संपत्ती, आता कोण असणार वारसदार?)

मोठी बहीण गमावली...- साळवे

साळवे म्हणाले की,' सुषमा स्वराज यांचं निधन म्हणजे माझ्यासाठी मोठ्या बहिणीला गमावण्यासारखंच आहे'. हे सांगत असताना साळवे अतिशय भावुक झाले होते.

(वाचा : सुष'माँ' स्वराज काळाच्या पडद्याआड, दुपारी 4 वाजता होणार अंत्यसंस्कार)

सुषमा स्वराज यांचं अखेरचं ट्विट

दरम्यान, लोकसभेत कलम 370 रद्द करणारं विधेयक मंजूर झाल्यानंतर स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं. 'मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी', हे त्यांचे अखेरचे शब्द होते.

========================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 02:07 PM IST

ताज्या बातम्या