नवी दिल्ली, 4 एप्रिल : दिल्लीला लागून असणाऱ्या नोएडा आणि गाझियाबादमध्ये दारु महाग होऊ शकते. कारण उत्तर प्रदेशात 1 एप्रिलपासून नवीन उत्पादन शुल्क सत्र सुरू झालं आहे. नवीन उत्पादन शुल्क सत्रात उत्तर प्रदेशात बिअर, देशी आणि विदेशी मद्याच्या नवीन किंमती लागू होतील. नवीन उत्पादन शुल्क सत्रात बिअर 1 एप्रिलपासून स्वत झाली असून देशी आणि विदेशी दारुचे दर वाढले आहेत.
1 एप्रिलपासून दारुवर नवीन पॉलिसी लागू -
1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि हरियाणामध्ये नव्या नियमांअंतर्गत मद्यविक्री होईल. दिल्लीत नव्या एक्साईज पॉलिसीअंतर्गत दारुचा जुना स्टॉक तीन महिन्यात संपवावा लागेल. दिल्लीत दारुच्या किंमती वाढणार नाहीत. परंतु नोएडा आणि गाझियाबादमध्ये दारु महाग झाल्याने, दिल्लीतील दुकानातील विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात दारु परमिट फीमध्ये वाढ -
उत्तर प्रदेश सरकारने 1 एप्रिलपासून विदेशी दारु, स्कॉच वाईन आणि वोडकासाठीच्या परमिट फीजमध्ये वाढ केली आहे. त्यानंतर 600 रुपयांहून अधिक किंमतीच्या एक्स कस्टम बॉन्डच्या दारुसाठी परमिट वाढवण्यात आलं आहे. यूपी सरकारच्या या नव्या पॉलिसीनंतर एक्साईज विभागाकडून सांगण्यात आलं की, 1 एप्रिलपासून यूपीमध्ये बिअरचे दर कमी झाले असून देशी आणि विदेशी दारुच्या दरात वाढ झाली आहे.
बिअर स्वस्त होणार -
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात बिअर 10 रुपये ते 30 रुपयांपर्यंत स्वस्त झाले असून, देशी दारुच्या 200 मिली लिटरच्या पॅकवर 5 रुपये वाढतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beer, Uttar pardesh