गोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारूबंदी

सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन लोक दंगा करतात. त्यामुळे इतरांना त्रास होतो म्हणून गोवा सरकारने ही बंदी लागू केली आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2017 12:31 PM IST

गोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारूबंदी

पणजी,18 सप्टेंबर: गोव्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बंदी करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. याआधी बीचवर दारू पिण्यावर बंदी घालण्यात आली होती.

सार्वजनिक ठिकाणी  दारू पिऊन लोक दंगा करतात. त्यामुळे इतरांना त्रास होतो म्हणून गोवा सरकारने ही बंदी लागू केली आहे.या संबंधीत सविस्तर नोटिफिकेशन गोवा सरकार ऑक्टोबर अखेरपर्यंत काढेल अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी दिली आहे. 'गोवा हा पार्टी स्पॉट असला तरी इथे मनमानी करण्याचा लोकांना अधिकार नाही. आम्हाला चांगले पर्यटक गोव्यात येणं अपेक्षित आहे.' असं गोव्याचे नगरविकास मंत्री विजय सरदेसाई यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 12:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...