Home /News /national /

हसावं की रडावं? 750 रुपये पेन्शनसाठी आजीबाईंची कॉटवरून 3 किलोमीटर चढाई, कारण वाचून व्हाल थक्क

हसावं की रडावं? 750 रुपये पेन्शनसाठी आजीबाईंची कॉटवरून 3 किलोमीटर चढाई, कारण वाचून व्हाल थक्क

पेन्शन (Pension) घेऊन पोस्टमन (Postman) गावात आला, पण तिथं अजिबातच नेटवर्क (Mobile network) नव्हतं. वाचा, पुढं काय घडलं...

    जयपूर, 17 सप्टेंबर : पेन्शन (Pension) घेऊन पोस्टमन (Postman) गावात आला, पण तिथं अजिबातच नेटवर्क (Mobile network) नव्हतं. पेन्शनची रक्कम पोस्टमनकडे होती, पेन्शन स्विकारणाऱ्या आजीबाईदेखील समोर होत्या. मात्र तरीही पेन्शन काही देता येत नव्हती. त्याचं कारण होतं पोस्टमनकडे असणारं आधुनिक ऍप. या सरकारी ऍपवर पेन्शन मिळाल्याची पावती म्हणून आजीबाईंचा अंगठा घेणं अत्यावश्यक होतं. मात्र नेटवर्कच नसल्यामुळे ही प्रक्रिया काही करता येईना. बराच विचार केल्यानंतर मग सर्वांनी मिळून एक कल्पना शोधून काढली. अशी होती कल्पना राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील आबुरोड गावात हा प्रकार घडला. 75 वर्षांच्या मोतरी गरासिया यांना त्यांची पेन्शन देण्यापूर्वी त्यांचा ऑनलाईन ऍपवर अंगठा घेणं गरजेचं होतं. त्यासाठी घरातील काही मंडळींनी आजीबाईंना कॉटवर झोपवलं आणि ती कॉट दोन्ही बाजूंनी उचलून डोंगर चढायला सुरुवात केली. पोस्टमन त्याच्या मोबाईलमध्ये नेटवर्क चेक करत करत डोंगर चढत होता, तर नातेवाईक त्याच्या मागून आजीबाईंची कॉट उचलून चालले होते. काही वेळानंतर कॉट उचलणाऱ्या व्यक्ती थकायला लागल्या. मात्र तरीही नेटवर्क काही येत नव्हतं. नेटवर्क आल्याशिवाय आपण पेन्शन देऊ शकत नाही, असं पोस्टमननं पुन्हा एकदा जाहीर केलं. मग सर्वांनी पुन्हा एकदा जोर लावून चढाईला सुरुवात केली. अखेर 3 किलोमीटर चढाई झाल्यानंतर पोस्टमननं नेटवर्क मिळाल्याचं सांगितलं. तिथे आजीबाईंची कॉट नातलगांनी खाली टेकवली. आजीबाई उठून बसल्या आणि पोस्टमननं त्यांचा अंगठा घेतला. त्यानंतर आजीबाईंना त्यांची 750 रुपयांची पेन्शन पोस्टमननं अदा केली. मात्र या 750 रुपयांच्या पेन्शनसाठी पोस्टमन, आजीबाई आणि कॉट उचणारे दोघे अशा चौघांना तीन किलोमीटर चढाई करावी लागली. हे वाचा - मित्रांनी घात केला, मुलांकडे लक्ष दे, पत्नीला फोन करून रिक्षाचालकाने संपवलं जीवन अनेक गावात नेटवर्कची समस्या राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्कच येत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पेन्शनसारखी सरकारी कामं तर रखडतातच, मात्र ऑलनाईन शिक्षणाचा गंधही या भागात पोहोचू शकलेला नाही.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Pension, Rajasthan

    पुढील बातम्या