धक्कादायक: बायकोला होतं Tik Tok Videoचं वेड, रागाने नवऱ्याने केली हत्या

धक्कादायक: बायकोला होतं Tik Tok Videoचं वेड, रागाने नवऱ्याने केली हत्या

'ती Tik Tok व्हिडीओ बनविण्यासाठी तासं तास घालवू लागली. तिचं तिला व्यसनच लागलं त्यामुळे घराकडे तिचं दुर्लक्ष झालं होतं.'

  • Share this:

विजयवाडा 8 नोव्हेंबर : तरुणांमध्ये Tik Tok Videoचं असलेलं वेड हे आता काही नवी गोष्ट राहिली नाही. शहरांमध्ये असलेलं हे लोन आता ग्रामीण भागातली गेलं असून बॉलिवूडसारखेच आता Tik Tok स्टारही झाले आहेत. Tik Tok व्हिडीओ बनविण्याचं वेड हे कधी व्यसनात बदलून जातं ते कळतंही नाही याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथं एक अशीच घटना समोर आली असून Tik Tok चं वेड असलेल्या बायकोमुळे वैतागलेल्या नवऱ्याने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. विजयवाडा जवळच्या कानिगिरी प्रकाशम जिल्ह्यातली ही घटना आहे. चिन्नापाचू साहिब आणि फातिमा या नवरा बायकोंमध्ये गेल्या काही महिन्यांपासून भांडणं होत होती.

मोदी, अमित शहा आणि फडणवीसांबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे, महत्त्वाचे 15 मुद्दे

या भांडणाचं कारण होतं Tik Tok. फातिमाही कायम Tik Tok व्हिडीओ बघत असे. त्यातून तिला असे व्हिडीओ तयार करण्याची सवय लगाली. सुरुवातीला चिन्नापासूलाही बायकोच्या या कलेचं कौतुक होतं.

मात्र नंतर फातिमाच्या या आवडीने वेगळंच वळण घेतलं. फातिमा Tik Tok व्हिडीओ बनविण्यासाठी तासं तास घालवू लागली. तिचं तिला व्यसनच लागलं त्यामुळे घराकडे तिचं दुर्लक्ष होऊ लागलं. यातूनच दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. चिन्नापाचूनं तिला समजविण्याचा खूप प्रयत्न केला मात्र फातिमावर त्याचा काही परिणाम झाला नाही.

शहा आणि उद्धव यांच्या त्या हायव्होल्टेज बैठकीत नेमकं काय घडलं होतं? गडकरींनी केल

त्यांच्यातलं हे भांडण विकोपाला गेलं. त्यांच्यात दुरावाही निर्माण झाला. घटनेच्या दिवशी चिन्नापासू हा जेव्हा घरी आला तेव्हाही फातिमा Tik Tok व्हिडीओ तयार करत होती. त्यानंतर त्यांच्यात भांडण झालं. रागाने चिन्नापासूने फातिमाची गळा दाबून हत्या केली. एवढ्यावर तो थांबला नाही तर त्याने तिचं शव पंख्याला लटकवलं.

आपल्या बायकोने आत्महत्या केल्याचं दाखविण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र पोस्टमार्टेममध्ये तिची गुदमरल्यामुळे हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी करताच चिन्नापासूने हत्येची कबूली दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: tik tok
First Published: Nov 8, 2019 10:22 PM IST

ताज्या बातम्या