नवरत्न तेलाच्या जाहिरातीमुळे बिग बी अडचणीत

नवरत्न तेलाच्या जाहिरातीमुळे बिग बी अडचणीत

जबलपूरमधील पी.डी. बाखले यांनी नवरत्न तेल निर्माती कंपनी ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप केलाय. यावर ग्राहक मंचाकडून या प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यात आली.

  • Share this:

03 आॅगस्ट : शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे शाहरूख खान आधीच अडचणीत सापडलाय त्यातच आता  बिग बी अमिताभ बच्चनही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अमिताभ यांच्या नवरत्न जाहिरातीबाबत एका ग्राहकांने ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे.जबलपूरमधील पी.डी. बाखले यांनी नवरत्न तेल निर्माती कंपनी ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप केलाय. यावर ग्राहक मंचाकडून या प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यात आली.

त्यावर ग्राहक मंचाने अमिताभ यांना नवरत्न ठंडा-ठंडा, कुल-कुल कसं ठरतं ?  याबाबत विचारणा केलीय. दरम्यान काही दिवसांपूर्वी शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीबाबत शाहरुख खानलाही भोपाळच्या स्थानिक न्यायालयाने नोटिस दिलीय. सदर क्रीम मध्य प्रदेश अन्न आणि औषध विभागाकडे तपासणीसाठी पाठवले असता वाईट दर्जाची असल्याचं समोर आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 10:59 AM IST

ताज्या बातम्या