असुविधेला वैतागून धर्माबादमधील 40 गावं तेलंगणाच्या वाटेवर

असुविधेला वैतागून धर्माबादमधील 40 गावं तेलंगणाच्या वाटेवर

प्रचंड असुविधा असल्यानं नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यातली ४० गावं तेलंगणाच्या वाटेवर आहेत. धर्माबाद तालुक्यात एकूण ५५ गावं आहेत. पण त्यापैकी ४० गावांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना निवेदन दिलंय.

  • Share this:

22 मे : प्रचंड असुविधा असल्यानं नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यातली ४० गावं तेलंगणाच्या वाटेवर आहेत. धर्माबाद तालुक्यात एकूण ५५ गावं आहेत. पण त्यापैकी ४० गावांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना निवेदन दिलंय.

सीमेलगतच्या ४० गावांमध्ये सुविधांचा प्रचंड अभाव आहे. या गावांमध्ये साधे रस्तेही नाहीत. त्यामुळे तेलंगणात जाण्यासाठी या गावांनी निवेदन दिलंय. आपल्याकडे महाराष्ट्र सरकार गेली ७० वर्ष फक्त दुर्लक्ष करत असल्याचं या ग्रामस्थांचा आरोप आहे. पण प्रशासन आणि पालकमंत्र्यांना मात्र याबाबत काहीही माहिती नाहीये.

आपण माहिती घेऊन याबद्दल बोलू असं पालकमंत्री रामदास कदम म्हणालेत. आजारी किंवा गरोदर महिलांनाही या रस्त्यांमुळे प्रचंड त्रास होतोय. या गावापासूनअवघ्या एक किलोमीटर अंतरावर तेलंगणातील गावं आहेत. मात्र तिथे अगदी शेताशिवारापर्यंत रस्ते आहेत. पाण्याची सुविधा आहे. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा तेलंगणाच बरा असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. निजामाबाद इथले सत्ताधारी सरकारचे आमदार बाज रेड्डी गोवर्धन यांना भेटून ग्रामस्थांनी हे निवेदन दिलं.

शासन आणी लोकप्रतीनिच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्यांच्या विळ्ख्यात अडकलेल्या सिमावर्ती भागतील गावांनी तेलंगणात समावेश करण्याची मागनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील सरपंच संघटनेने या मागनीचे निवेदन तेलंगणाच्या मुख्यमत्र्यांना निवेदन दिले. धर्माबाद तालुक्यातील 40 गावातील सरपंच आणी गावक-यांची तेलंगानात जाण्यासाठी सहमती असल्याचा सरपंच संघटनेचा दावा आहे.

 

First published: May 22, 2018, 12:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading