बालाघाट, 12 ऑक्टोबर : वन्य प्राणी आपल्या अंगावर आले किंवा आपल्या पिकांची नासधूस केली तरी त्यांना जीवे मारलं जातं मात्र एका वनरक्षकानं अंगावर धावून आलेल्या वन्य प्राण्याला संधी असूनही जीवे मारलं नाही तर आपल्यावरचा हल्ला परतवून लावत या प्राण्याला जीवदान दिलं. सध्या या वनरक्षकाचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. या वनरक्षकाला पुरस्कार देण्याची मागणीही सर्व स्तरातून केली जात आहे.
8 ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास हा वन रक्षक जात असताना त्याच्यावर अस्वलानं प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यावेळी वनरक्षकाच्या हातात धारदार कुऱ्हाड होती. एका घाव दोन तुकडे करून अस्वलाला जागीच ठार करणं सहज शक्य होतं मात्र तसं न करता त्यानं कुऱ्हाडीच्या मागच्या दांडक्यानं हा हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वनरक्षक झामसिंह टेकाम गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेतही त्यांनी अस्वलाला जीवे न मारता हल्ला परतवून लावत जीवदान दिलं.
Jham Singh Tekam of Kanha Tiger Reserve came across a sloth bear in jungle. He was having a kulhadi (axe) but did not attacked the bear so that the life of the animal is not compromised. My salutations. #GreenHero
या वनरक्षकानं ही घटना बालाघाट इथे असलेल्या नॅशनल पार्कमध्ये घडल्याची माहिती दिली. या अस्वलाला परतवून लावत त्यानं नॅशनल पार्कमधील प्राण्यांचा देखील जीव वाचवला. जखमी झालेल्या झामरसिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
प्राण्यांचा जीव वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे हातात धारधार शस्त्र असलं तरीही मी त्याला जीवे न मारता त्याचा हल्ला फक्त परतवून लावला आणि त्यासाठीच सरकारनं माझी नेमणूक केली आहे. त्यामुळे मी त्याचा जीव घेऊ शकलो नाही. कुऱ्हाडीनं या अस्वलाचा सामना केला असता तर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता जे करणं चुकीचं होतं अशी प्रतिक्रिया झाम सिंह यांनी दिली आहे.