Article 370, Kashmir : हडबडलेल्या पाकिस्तानने भारताला दिली युद्धाची धमकी

Article 370, Kashmir : हडबडलेल्या पाकिस्तानने भारताला दिली युद्धाची धमकी

काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द झाल्यानंतर पाकिस्तान चांगलाच हडबडला आहे. आता पाकिस्तानने भारत सरकारला युद्धाची धमकी दिली आहे.भारत काश्मीरला फिलिस्तान बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पाकिस्तानने केला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 6 ऑगस्ट : काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द झाल्यानंतर पाकिस्तान चांगलाच हडबडला आहे. आता पाकिस्तानने भारत सरकारला युद्धाची धमकी दिली आहे.भारत काश्मीरला फिलिस्तान बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. भारताला काश्मीरची लोकसंख्या बदलायची आहे, असंही पाकिस्तानी नेत्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी सरकारमधले एक मंत्री आणि इम्रान खान यांचे जवळचे नेते फवाद चौधरी म्हणाले की, भारत सरकारच्या या निर्णयाला रक्त, अश्रू आणि घामाने उत्तर द्यावं लागेल.आपल्याला युद्धासाठी तयार राहणं गरजेचं आहे.

<blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="en" dir="ltr">Modi Govt is trying to make Kashmir another Palestine by changing the population demography and bringing settlers into Kashmir, Parliamentarians must stop fighting on trivial issues lets respond India by blood, tears, toil and sweat, we must be ready to fight if war is imposed</p>&mdash; Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) <a href="https://twitter.com/fawadchaudhry/status/1158659924978806784?ref_src=twsrc%5Etfw">August 6, 2019</a></blockquote>

<script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

'ट्र्म्प यांनी मूर्ख बनवलं'

पाकिस्तानच्या संसदेत काश्मीरवर चर्चा करण्यासाठी संयुक्त सत्र आयोजित करण्यात आलं होतं पण या सत्राला पंतप्रधान इम्रान खान मात्र हजर नव्हते. यामुळे विरोधकांनी सभागृहात एकच गदारोळ केला. यानंतर संसदेचं कामकाज थांबवण्यात आलं आणि अध्यक्ष त्यांच्या कक्षात परतले.

'अमित शहांनी धोका दिला' म्हणत माजी मुख्यमंत्री रडू लागले...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनीही इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थीची भाषा करून इम्रान खान यांना मूर्ख बनवलं आहे, असं मरियम नवाज म्हणाल्या. या सगळ्या घडामोडींमध्ये भारत सरकार काश्मीरबद्दल काय प्लॅनिंग करतंय हे इम्रान खान यांना कळू शकलं नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

कलम 370

आतापर्यंत जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र राज्यघटना होती. केंद्र सरकार आणि काश्मीरचे राजे हरिसिंग यांच्यात 26 ऑक्टोंबर 1947 मध्ये काश्मीरच्या विलिनीकरणाचा करार झाला होता. यानुसार जम्मू काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा आणि विशेष अधिकार मिळाले होते.आता मात्र भारत सरकारने कलम 370 रद्द करत काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आहे. त्याबरोबरच जम्मू - काश्मीर आणि लडाख असं काश्मीरचं विभाजन केलं जाणार आहे.

=================================================================================================

VIDEO '...आणि हे मंत्री नाचतायत'; महाजनांच्या जल्लोषावर अजित पवारांची बोचरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 05:18 PM IST

ताज्या बातम्या