नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : पाकिस्तानने आपल्या कारवायांना आवर (Be ready for another surgical strike warns Amit Shah to Pakistan) घातला नाही, तर पुन्हा एका सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार राहावं, असा इशारा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिला आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या दहशतवादी कारवायांच्या (growing terror activities in Pakistan) पार्श्वभूमीवर त्यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा ताणले जाण्याची शक्यता आहे.
काश्मीरमधील कारवायांमध्ये वाढ
काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. भारतीय सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलीस बहुतांश कारवाया हाणून पाडत असले, तरी पाकिस्तानपुरस्कृत संघटना कारवाया कमी करत नसल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जर कारवाया थांबल्या नाहीत, तर त्याच शब्दात उत्तर देण्याचा इशारा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिला आहे.
करून दिली 2016 ची आठवण
पाकिस्तानला इशारा देताना अमित शाह यांनी 2016 ची आठवण करून दिली आहे. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक कऱण्यात आला होता. भारतावर हल्ला करणे, सीमेवर कारवाया करणे आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणे या बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत, हा इशारा देण्याचा प्रयत्न भारताने केला होता. पुन्हा जर पाकिस्तानकडून तशाच प्रकारची आगळीक होत असेल, तर भारताकडून पुन्हा एकदा कारवाई केली जाऊ शकते, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
हिंदूंना केलं जातंय टार्गेट
जम्मू काश्मीरमधील हिंदू आणि शीख समुदायावर होणाऱे हल्ले गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. भारतीय सैनिकांवरही हल्ले होत आहेत. हे प्रकार दहशतवादी संघटनांकडून होत असून पाकिस्तानचं सहकार्य असल्याखेरीज या संघटना कारवाई करू शकत नसल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या इशाऱ्यानंतर आता पाकिस्तानचं त्यावर काय उत्तर येतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Jammu and kashmir, Pakisatan