सावधान! चिकन खाताय की 'कौआ बिर्याणी'? चिकन-मटण म्हणून विकलं जातंय कावळ्याचं मांस

सावधान! चिकन खाताय की 'कौआ बिर्याणी'? चिकन-मटण म्हणून विकलं जातंय कावळ्याचं मांस

सध्या जगभरात चीनमधून आलेला कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. मांसाहार टाळा अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत. अशावेळी रस्त्यावर चिकन-मटणच्या नावाखाली 'कौआ बिर्याणी' विकली जात आहे. नक्कीच ही बाब सामान्यांच्या जीवावर बेतणारी आहे.

  • Share this:

रामेश्वरम, 1 फेब्रुवारी : रस्त्यावर चिकन किंवा मटण खात आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही कधी खातरजमा केली आहे का, की जे चिकन तुम्ही खात आहात ते नेमकं कशाचं आहे? चिकनच्या नावाखाली तुम्हाला कावळ्याचं मांस तर विकलं जात नाही आहे ना? कारण असे प्रकार घडत आहेत. अन्न पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात ही बाब उघडकीस आली आहे. चिकनच्या नावाखाली स्वस्तात विकलं जाणारं हे मांस कावळ्याचं आहे असा संशयही कुणाला येणार नाही. पण मांसविक्रेत्यांनी हे उद्योग सर्रास केलेले आहेत. याप्रकरणात पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे, ज्यांच्याकडे 150 मेलेले कावळे सापडले आहेत.

सध्या जगभरात चीनमधून आलेला कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. मांसाहार टाळा अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत. अशावेळी रस्त्यावर चिकन-मटणच्या नावाखाली 'कौआ बिर्याणी' विकली जात आहे. नक्कीच ही बाब सामान्यांच्या जीवावर बेतणारी आहे. हा प्रकार घडला आहे तामिळनाडूमध्ये. राज्यातील रामेश्मरम याठिकाणी चक्क चिकनऐवजी कावळ्याचं मांस खुलेआम विकलं जात आहे.

(हेही वाचा : थालीनॉमिक्‍स : शाकाहारी भोजन करणारे 10 हजार रुपयांपेक्षा जास्त करतात बचत)

तामिळनाडूतील या प्रकरणाचा खुलासा रामेश्वरममध्ये येणाऱ्या भाविकांना आलेल्या संशयामुळे झाला. मंदिर परिसरात अनेक भाविक कावळ्यांना दाणे खाऊ घालतात. मात्र गेल्या काही दिवसात याठिकाणी मेलेले कावळे आढळण्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळे भाविकांना संशय आला आणि त्यांनी याबाबत तक्रार केली. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर पोलिसांच्या असं लक्षात आलं की या कावळ्यांना विषारी तांदळाचे दाणे खायला घातले जात आहेत. कावळ्यांची शिकार करणाऱ्यांचा शोध लावून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चौकशीनंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या शिकाऱ्यांनी कावळ्याचं मांस स्थानिक दुकानदारांना विकलं आहे. ज्याचा वापर ते बिर्याणी, लॉलीपॉप आणि विविध चिकनचे पदार्थ बनवण्यासाठी करतात.

(हेहा वाचा : अति तिथे माती! तोंडभरुन केक खाल्ल्याने महिलेचा गुदमरुन मृत्यू)

चिकनच्या नावाखाली कावळ्याचं मांस विकण्याची ही पहिलीच घटना नाही आहे. याआधीही कुत्र्या-मांजरांचं मांस आणि कावळ्याचं मांस विकून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार घडले आहेत. 2018मध्ये मुंबई, चेन्नई, कोलकातामध्ये अन्नविभागाने घातलेल्या छाप्यात यांसारखी अनेक प्रकरणं उघडकीस आली होती.

 

First published: February 1, 2020, 3:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या