बस्तर, 02 डिसेंबर: छत्तीसगढच्या बस्तर जिल्ह्यात शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. जगदलपूर शहरात मालगांवमध्ये मातीची खाण कोसळल्याने ७ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक कामगार अद्याप खाणीत अडकले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पाच लोकांचा मृत्यू खाणीतच झाला होता तर दोघांचा मृत्यू रुग्णालयात नेत असताना झाला. या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटलं की, जगदलपूरच्या मालगावमध्ये एका खाणीत दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो. जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.
जगदलपुर के मालगांव में एक खदान में हादसे के दौरान 6 श्रमिकों की दुखद मृत्यु का समाचार मिला है। ईश्वर दिवंगत श्रमिकों की आत्मा को शांति एवं उनके परिवारों को हिम्मत दे। साथ ही घायलों के शीघ्र स्वास्थ्य लाभ की कामना करता हूँ। अन्य फंसे हुए लोग सुरक्षित निकलें, ऐसी प्रार्थना है।
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) December 2, 2022
हेही वाचा : मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नका; चंद्रकांत पाटलांच्या दौऱ्याआधी CM बोम्मईचं मोठं वक्तव्य
घटनास्थळी एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. आतापर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. तसंच ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मातीचा ढिगारा काढण्यासाठी जेसीबीचा वापर केला जात आहे. एसडीआरएफसह जिल्हा पोलिसांचे पथकही घटनास्थळी आहे. दुर्घटना घडलेल्या खाणीत सर्व कामगार काम करत होते.
मातीच्या खाणीतून गावकरी चुन्यासारखी माती काढतात. याचा वापर घराच्या भिंती सारवण्यासाठी ग्रामस्थ करतात. ग्रामस्थ नेहमीच खाणीत जाऊन खणून ही माती काढतात. ही खाण चुनखडकापेक्षा थोडी ठिसूळ असते यामुळे यात माती घसरून दुर्घटनेचा धोका असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Chattisgarh