Home /News /national /

13 व्या वर्षी झालं पाचवी शिकलेल्या बसंतीचं लग्न; मात्र जिद्द सोडली नाही, आता झाली शिक्षिका!

13 व्या वर्षी झालं पाचवी शिकलेल्या बसंतीचं लग्न; मात्र जिद्द सोडली नाही, आता झाली शिक्षिका!

अनेकदा परिस्थिती तुमची परिक्षा पाहते. मात्र तिला कसं हाताळाचं जाणून घ्या या सत्यकथेतून.

    सिरोही, 21 मार्च : आपण अशा अनेक व्यक्ती पाहतो, ज्या प्रतिकूलतेला घाबरून हातपाय गाळून बसतात. मात्र अनेक व्यक्ती अशा असतात, ज्या या प्रतिकूलतेलाच आपली प्रेरणा बनवत स्वतःसह इतरांच्याही जीवनात प्रकाश आणतात. अशाच एक महिला आहेत बसंती देवी. दक्षिण राजस्थानमध्ये एका लहानशा गावात 43 वर्षीय बसंतीदेवी राहतात. त्या आपल्याच गावात शिक्षिका आहेत. त्यांचं बालपण हलाखीत गेलं. आई-वडील बालपणीच वारले. त्यांच्या आजीनं सिरोही जिल्ह्यातील एका लहानशा गावी त्यांना वाढवलं. बसंती पाचवीपर्यंत शिकल्या आणि वयाच्या तेराव्या यावर्षी त्यांचं लग्न झालं. (basanti devi inspiring story) त्यानंतर त्या ठंडी बेरी या गावात आपल्या पतीसह राहू लागल्या. हे सिरोहीपासून जवळपास 50 किलोमीटर दूर आहे. बसंतीचा पती हकमा राम दहावी पास आहे. त्याला वाटायचं, की पत्नीनंही पुढं शिकावं. (basanti devi becomes teacher) लग्नाच्या काही वर्षांनंतर समाजकल्याण विभागानं शिक्षाकर्मी योजना सुरू केली. याअंतर्गत पाचवीपर्यंत शिकलेले लोक ग्रामीण भागात शिक्षकाच्या पदासाठी अर्ज करू शकतात. बसंतीनंही या पदासाठी अर्ज केला आणि त्या आपल्या गावात शिक्षिका बनल्या. 2000 साली या पदावर काम करताना त्यांना 600 रुपये प्रती महिना पगार मिळू लागला. (basanti devi overcomes the obstacles to become teacher) हेही वाचा महिलाही होऊ शकतात रेस्तराँच्या उत्तम शेफ; अनुकृती देशमुख बदलवतेय मानसिकता बसंती सांगतात, की सर्वात आधी त्यांना पगार मिळाला, तेव्हा त्यांनी सगळे पैसे आपल्या सासूबाईंना दिले. गरिबीमुळं त्यांनी इतके पैसे कधीच पाहिले नव्हते. त्या नंदी झाल्या. त्यानंतर त्यांनी कधीच बसंतीच्या नोकरीला विरोध केला नाही. (victim of child marriage basanti devi now a teacher) गावात मुलांना शिकवण्यासोबतच बसंतीनं आठवीचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर राज्यस्तरीय खुल्या शाळेतून दहावी पास केली. त्यानंतर नवऱ्याच्या मदतीनं बारावीपर्यंत शिकल्या. एका अखासगी कॉलेजमधून बीएही पूर्ण केलं. यानंतर एसटीसीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. हेही वाचा धान्य आणण्यासाठी रांगा लावण्याची गरज नाही; मोदी सरकारनं लाँच केलं मेरा राशन app बसंतीला या गोष्टीचा आनंद आहे, की गावात आता अभ्यासाचं चांगलं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांनी मुलांना शिकवणं सुरू केलं तेव्हा केवळ 5 मुली शाळेत येत होत्या. आता ही संख्या 300 झाली आहे. बसंती दिवसा मुलांना शाळेत शिकवतात आणि संध्याकाळी याच मुलांच्या घरी जात त्यांच्या आई-वडिलांना शिक्षणाचं महत्त्व सांगतात. विशेष म्हणजे, बसंती यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांच्या पतीनंही पदवी घेतली. ते स्थानिक ग्रामपंचायतीत काम करू लागले. हकमा राम बायकोचं भरभरून कौतुक करताना म्हणतात, 'मी पत्नीमुळं शिक्षण घेतलं. आज बसंतीनं शिकवलेले अनेक विद्यार्थी चांगला अभ्यास करत आहेत.' मात्र बसंती आजही कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावरच नोकरी करतात. त्यांना दर महिन्याला 8000 रुपये पगार मिळतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Education, Inspiring story, Rajsthan, School teacher

    पुढील बातम्या