Home /News /national /

या गावात लग्नाळू पोरांचा आलाय पूर! गावाचं नाव ऐकूनच मुली देतायेत नकार, पालक तोडतायेत संबंध

या गावात लग्नाळू पोरांचा आलाय पूर! गावाचं नाव ऐकूनच मुली देतायेत नकार, पालक तोडतायेत संबंध

बाडमेरच्या बाचिया गावाची (Bachia village) वेदनादायक कहाणी : भारत-पाकिस्तानच्या सीमेवर वसलेले बाडमेरचे बाचिया गाव असे आहे की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही पाणी, वीज, रस्ता आणि मोबाईल नेटवर्क या मूलभूत सुविधांपासून ते कोसो दूर आहे. गावाची ही अवस्था पाहता येथे आपल्या मुलीचे लग्न कोणीही करू इच्छित नाही. त्यामुळे गावात अविवाहित तरुणांची रांग लागत आहे. काळानुसार हे गाव वाढण्याऐवजी आकुंचन पावत आहे.

पुढे वाचा ...
    बारमेर, 13 जून : देशातील अनेक खेड्यागावात मुलामुलींच्या लग्नाचा (Marriage) गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही मुलांची लग्न जमवणे तर आणखी कठीण होऊन बसले आहे. काही गावांचा तर विषयच वेगळा आहे. भारत-पाकिस्तानच्या सीमेवर वसलेल्या बाडमेर जिल्ह्यात एक गाव असं आहे, की कोणत्याही पालकाला आपल्या मुलींचं लग्न तिथल्या मुलांशी करुन द्यायचं नाही. आज जगातील लोक 5G आणि मंगळावरील पाण्याबद्दल बोलत असले तरी, भारत-पाक सीमेवर वसलेल्या बाचिया गावात (Bachia village) अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. वीज, पाणी, औषधोपचार, रस्ते, शिक्षण या सुविधांअभावी हे गाव वर्षानुवर्षे ओसाड राहिलं आहे. न जाणो किती सरकारे आली आणि गेली पण या गावाची बाजू कोणी पाहिली नाही. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही या गावात कोणतीही सुविधा नाही. असे म्हणतात की, आपल्या मुलीचे नाते ठरवण्यापूर्वी तिचे पालक भावी जावयाचे घर आणि कुटुंब पाहतात. जिथून संबंध आले आहेत त्या ठिकाणी सोयीसुविधा आहेत का तेही बघतात. सर्व बाजूंनी खात्री झाल्यानंतरच वडील मुलीचे नाते ठरवतात. मात्र, मुलींच्या बापाच्या या निकषावर बारमेर जिल्ह्यातील बाचिया गाव कोणत्याही प्रकारे बसत नाही. यामुळेच येथील अनेक तरुण आजही अविवाहित बसले आहेत. काहींचे तर लग्नाचे वयही निघून गेले आहे. तुम्ही 30 वर्षांचे झालात? आणखी किती जगू शकाल? भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ गावाचा उल्लेख येताच मुलगी स्पष्टपणे देते नकार यामुळेच लोक या गावाशी संबंध ठेवण्यास टाळाटाळ करतात. गावातील ज्येष्ठ सीता देवी सांगतात की गावातील मुलांना लोक पसंत करतात. पण, गावाचा उल्लेख येताच त्या नात्याला स्पष्टपणे नकार देतात. वीज, पाणी, वैद्यकीय, रस्ते या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेले हे गाव स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही वाढण्याऐवजी लहान होत चालले आहे. गाव वाढण्याऐवजी आकुंचन पावत आहे ग्रामस्थांच्या मते, एकेकाळी हे गाव खूप मोठे होते. पण आज ते आकुंचन पावत चालले आहे. आता गावात फक्त ऐंशी ते शंभर घरांची लोकसंख्या राहते. विकासाच्या आशेने या गावातील रहिवासी राजकीय नेत्यांकडे डोळे लावून बसतात. मात्र, राजकारण्यांना हे गाव दिसत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांनी गावातून स्थलांतर केले. कुणी बारमेरला जाऊन कुठेतरी स्थायिक झाले. त्यामुळे गावातील लोकसंख्या व घरे कमी होत आहेत.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Marriage, Rajasthan

    पुढील बातम्या