'भारतासारख्या मोठ्या देशात एक-दोन बलात्कार घडतात', केंद्रीय मंत्र्यांची मुक्ताफळं

'भारतासारख्या मोठ्या देशात एक-दोन बलात्कार घडतात', केंद्रीय मंत्र्यांची मुक्ताफळं

'भारतासारख्या मोठ्या देशात असे एक-दोन बलात्कार होत असतात', असं खळबळजनक आणि वादग्रस्त विधान भाजप सरकारचे कॅबिनेट मंत्री संतोष गंगवार यांनी केलं आहे.

  • Share this:

22 एप्रिल : 'भारतासारख्या मोठ्या देशात असे एक-दोन बलात्कार होत असतात', असं खळबळजनक आणि वादग्रस्त विधान भाजप सरकारचे कॅबिनेट मंत्री संतोष गंगवार यांनी केलं आहे. एकीकडे मोदी सरकार देशातले महिला बलात्कार थांबवण्यासाठी कठोर कायदे लागू करतंय तर दुसरीकडे भाजप सरकारचे कॅबिनेट मंत्री संतोष गंगवार यांनी असे वादग्रस्त विधान केलं आहे.

सध्या संतापाचा आणि अतिसंवेदनशील विषय असणाऱ्या उन्नाव आणि कठुआ बलात्कारच्या घटनांबाबत बोलताना गंगवार म्हणाले की, भारतासारख्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना होत राहतात, ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. खरं तर त्यांच्या या विधानामुळे त्यांनी अकलेचे तारे तोडले असं म्हणायला हरकत नाही आहे. यातूनच सरकार किती संवेदनशील आहे हे ही उघड होतं.

संतोष गंगवार यांनी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये शनिवारी हे वादग्रस्त विधान केलं. अशा घटना कधी कधी थांबवल्या जाऊ शकते नाही पण तरीही सरकार सर्वत्र सक्रियपणे आपलं काम चांगल्यापद्धतीने करत आहे. असंही गंगवार म्हणाले आहेत.

त्यांच्या या विधानावर सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात विरोध आणि राग व्यक्त केला जात आहे. कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाचे पडसाद फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले.

महिलांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्यावरील अत्याचाराचा प्रश्न इतका गंभीर असताना भाजप सरकारमधील एखाद्या नेत्याने असं विधान कराव म्हणजे कितपत योग्य आहे असा सवाल आता विचारला जातोय.

First published: April 22, 2018, 10:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading