मराठी बातम्या /बातम्या /देश /

जिद्दीला सलाम! आजारी आहे, कमजोर नाही, गंभीर आजाराने ग्रस्त तरुणी ऑक्सिजन सिलेंडर लावून देतेय परीक्षा

जिद्दीला सलाम! आजारी आहे, कमजोर नाही, गंभीर आजाराने ग्रस्त तरुणी ऑक्सिजन सिलेंडर लावून देतेय परीक्षा

उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) या मुलीला फुफ्फुसांचा आजार आहे, ज्यामुळे तिला डॉक्टरांनी 24 तास ऑक्सिजन सिलेंडरवर (oxygen cylinder) राहण्याचा सल्ला दिला आहे.

  • Published by:  Priya Lad
बरेली, 29 फेब्रुवारी : जिद्द, चिकाटी आणि विश्वास असेल तर कोणत्याही संकटांवर आपण मात करू शकतो, याची प्रचिती उत्तर प्रदेशच्या बरेलीतील (Bareilly) या मुलीला पाहून येईल. जी गंभीर अशा आजाराने ग्रस्त आहे, मात्र तरीदेखील ऑक्सिजन सिलेंडर (oxygen cylinder) लावून ती परीक्षा देते आहे. या मुलीचं नाव आहे, साफिया जावेद (Safia javed). 16 वर्षांची साफिया फुफ्फुसाच्या (lung) आजाराने  ग्रस्त आहे. गेल्या 5 वर्षांपासून तिला फुफ्फुसांचा आजार आहे. ज्यामुळे थोडं जरी चाललं तरी तिला श्वासाची समस्या उद्भवते, श्वास घेण्यात त्रास होतो. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला 24 तास ऑक्सिजन सिलेंडरवर राहण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या वर्षभरापासून साफिया ऑक्सिजन सिलेंडरवरच जगते आहे. हेदेखील वाचा - जाडी म्हणून होणाऱ्या नवऱ्यानं तोडलं नातं; तरुणीनं अशी घडवली अद्दल साफिया दहावीला आहे. यूपी बोर्डची दहावीची परीक्षा सुरू आहे. साफियाने घरी हा ऑक्सिजन सिलेंडर लावून दहावीच्या परीक्षेचा अभ्यास केला. मात्र परीक्षा केंद्रावर हा ऑक्सिजन सिलेंडर लावून 3 तास परीक्षा कशी द्यायची याची चिंता तिला होती. मात्र तिच्या कुटुंबानं आणि नातेवाईकांनी तिला बळ दिलं. त्यामुळे साफिया खचली नाही, तिच्यातीला आत्मविश्वास वाढला आणि ती जिद्दीने दहावीची परीक्षा देते आहे. साफियाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, माझ्या कुटुंबानं मला साथ आणि हिंमत दिली, त्यामुळेच मी हे करू शकते. मला कॉम्प्युटर सायन्स आवडतं, मात्र भविष्यात काय व्हायचं हे अजून मी ठरवलं नाही. हेदेखील वाचा - ब्रेडवर लावताय ते Butter अळ्यांपासून बनवलेलं तर नाही ना? Video पाहून येईल किळस शिक्षण विभागानंही साफियाला पुरेपूर मदत केली. बरेली मंडळाचे प्रदीप कुमार यांनी सांगितलं, . साफियाची ही चिकाटी आणि हिंमत पाहून कुणीही हैराण होईल. साफियाच्या हिमतीला मी सलाम करतो. तिचे मित्रमैत्रिणीही तिच्या या हिमतीला दाद देतात. साफिया म्हणजे इतर मुलींसाठी एक प्रेरणा आहे.
First published:

Tags: 10th exam, Health, Uttar pardesh

पुढील बातम्या