दलित मुलाशी लग्न करणाऱ्या BJP आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाली नवऱ्याच्या जीवाला धोका

दलित मुलाशी लग्न करणाऱ्या BJP आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाली नवऱ्याच्या जीवाला धोका

दलित मुलाशी लग्न केल्यानं जीवाला धोका असल्याचा भाजप आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:

बरेली, 11 जुलै : बरेली जिल्ह्यातील बितरी चैनपुरी जिल्ह्यातील भाजप आमदार राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल यांच्या मुलीनं एका दलित मुलाशी लग्न केलं. साक्षी असं त्या मुलीचं नाव असून तिचा व्हिडीओ आता व्हायरल होत असून त्यामध्ये तिनं नवऱ्याच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. बुधवारी संध्याकाळी व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये साक्षीचा पती अजितेश कुमार देखील आहे. साक्षी आणि अजितेशनं हिंदू रितीनं लग्न केलं. पण, लग्न करणं आता जीवावर बेतलं आहे. याबाबत तिनं हायकोर्टात याचिका दाखल केली असून त्यामध्ये वडील पप्पू भरतौल, भाऊ विक्की भरतौल आणि भावाचा मित्र राजीव राणा यांच्याकडून जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं साक्षीनं आता एसपी यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

मोदी सरकार विकणार 34 वर्षे जुनी कंपनी; जाणून घ्या कारण

काय आहे व्हिडीओमध्ये

जातीबाहेर लग्न केल्यानं नवऱ्याच्या जीवाला धोका असल्याचं साक्षी या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. तिचा पती देखील या व्हिडीओमध्ये दिसत असून त्यानं देखील सुरक्षेची मागणी केली आहे. आमदाराचे लोक आमच्या मागावर असून आमदाराचे मित्र राजीव राणा आपल्या लोकांसोबत हॉटेलमध्ये दाखल झाले असा दावा देखील साक्षीनं केला आहे. दरम्यान, अजितेश कुमारशी लग्न करून आपण खुश आहोत असं देखील साक्षीनं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तसंच पती किंवा त्याच्या कुटुंबियांना काही झाल्यास मी सर्वांना गजाआड पाठवेन असा इशारा साक्षीनं आपल्या वडिलांना दिला आहे.

तुमच्या बचत खात्यातले पैसे 'इथे' गुंतवा, होईल दुप्पट फायदा

4 जुलैला केलं लग्न

साक्षीनं 4 जुलै रोजी प्रयागराज येथे एका मंदिरात अजितेश कुमारशी लग्न केलं. त्यानंतर दोघंही घरातून गायब आहेत. अजितेश हा फरिदपूर येथील आमदाराचा नातेवाईक असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यानंतर त्यांनी व्हिडीओद्वारे आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे.

गटारात पडलेल्या चिमुकल्याचा शोध सुरू; मनपाच्या अधिकाऱ्यांची मिठाची

First published: July 11, 2019, 1:29 PM IST
Tags: BJPBJP MLA

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading