लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापल्यानं 'प्रियंका' होत्या नाराज, पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस

लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापल्यानं 'प्रियंका' होत्या नाराज, पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस

लोकसभा निवडणूक 2019चं तिकीट कापल्यानं प्रियंका यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती.

  • Share this:

लखनौ, 1 मे : भाजपच्या बाराबंकी येथील विद्यमान खासदार प्रियंका रावत यांची मनधरणी करण्यात पक्षाला अखेर यश आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका रावत आपल्याच पक्षावर नाराज होत्या. पण आपला राग बाजूला सारून प्रियंका रावत बाराबंकी येथील हैदरगडमध्ये झालेल्या भाजपच्या जाहिरसभेमध्ये सहभागी झाल्या होत्या. एवढंच नाही तर त्यांनी व्यासपीठावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फुलांचा गुलदस्तादेखील भेट दिला. पंतप्रधान मोदींनीही उभे राहून प्रियंकांची भेट स्वीकार केली आणि 'ताई, ठीक आहेस ना?' असं म्हणत त्यांची विचारपूसदेखील केली. यावर प्रियंका म्हणाल्या की, 'हो ठीक आहे... तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे'.

या कारणामुळे प्रियंका रावत होत्या नाराज

लोकसभा निवडणूक 2019चं तिकीट न दिल्यानं प्रियंका रावत पक्षावर नाराज होत्या. यासंदर्भात त्यांनी आपला विरोधीदेखील जाहिररित्या दर्शवला होता. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जाहिरसभांमध्येही त्यांनी सहभागी होणं टाळलं होतं. या घडामोडी पाहता प्रियंका पंतप्रधान मोदींच्या सभेत उपस्थित राहणार की नाहीत? याबाबतही प्रश्नचिन्ह कायम होतं. पण आपला राग विसरून अखेर त्या पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी हजर राहिल्या.

टिकट कटने से नाराज इस महिला MP ने जब भेंट किया गुलदस्ता, तो पीएम मोदी ने पूछा...

भाजप खासदार प्रियंका रावत

वाचा अन्य बातम्या

VIDEO: 'बुरखा' आणि 'नकाब'वर बंदी आणू नये- रामदास आठवले

कल्याण लोकसभेत EVM च्या नोंदणीचा घोळ? शिवसेनेकडून प्रश्नचिन्ह

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

VIDEO: मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, भाजप नगरसेवकावर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 12:23 PM IST

ताज्या बातम्या