News18 Lokmat

दहावीत टॉप केलं म्हणून योगी आदित्यनाथ यांनी दिलेला चेक झाला बाऊंस आणि...!

उत्तर प्रदेश बोर्डच्या दहावीच्या एका टॉपर विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बक्षिस म्हणून दिलेला पैशांचा चेक बाऊंस झाला आहे. बरं इतकच नाही तर ...

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2018 05:34 PM IST

दहावीत टॉप केलं म्हणून योगी आदित्यनाथ यांनी दिलेला चेक झाला बाऊंस आणि...!

उत्तर प्रदेश, 09 जून : उत्तर प्रदेश बोर्डच्या दहावीच्या एका टॉपर विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बक्षिस म्हणून दिलेला पैशांचा चेक बाऊंस झाला आहे. बरं इतकच नाही तर चेक बाऊंस झाला म्हणून बँकेने विद्यार्थ्याकडून दंडही वसूल केला. हा सगळा प्रकार बाराबांकी जिल्ह्यात घडला आहे.

बारांबाकी जिल्ह्यात यंग स्ट्रीम इंटर कॉलेजात शिकणाऱ्या आलोक मिश्राला दहावीमध्ये 93.5 टक्के पडले आहेत. या गुणांनी त्याने जिल्ह्यात टॉप केलाय तर संपूर्ण राज्यात त्याचा 7वा क्रमांक आला आहे. त्याच्या या यशामुळे त्याचं सगळ्यांकडून कौतूक केलं जातंय.

आलोकने जिल्ह्यात टॉप केल्यामुळे 29 मे रोजी त्याला लखनऊला बोलावण्यात आलं होतं. आणि तिथे एका कार्यक्रमात त्याला योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 1 लाखा रुपयांचा चेक देण्यात आला. या चेकवर बारांबाकीचे शाळा निरीक्षक राजकुमार रावल यांची स्वाक्षरी करण्यात आली होती. 5 जून 2018ला आलोकने हा चेक बँकेत जमा केला. पण हा चेक बाऊंस झाल्याचं त्याला समजलं.

नेटवर्क 18शी बोलताना आलोकने सांगितलं की, 'मुख्यमंत्र्यांकडून चेक मिळाल्यामुळे मी खूप खुश होतो पण चेक बाऊंस झाल्यामुळे मी नाराज झालो आहे.' आता यावर योगी आदित्यनाथ काय प्रतिक्रिया देणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2018 05:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...