संतापजनक! प्रेग्नंट तरुणीवर 11 वेळा गँगरेप, बॉयफ्रेंडसमोरच केले अत्याचार, त्याचीही आत्महत्या

संतापजनक! प्रेग्नंट तरुणीवर 11 वेळा गँगरेप, बॉयफ्रेंडसमोरच  केले अत्याचार, त्याचीही आत्महत्या

प्रचंड धक्का बसलेल्या महिलेच्या मित्राने तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी विविध स्वयंसेवी संघटनांनी केली आहे.

  • Share this:

जयपूर 11 ऑगस्ट : महिलांची सुरक्षा आणि सन्मान याविषयी देशभर चर्चा होत असताना राजस्थानातून एक संतापजनक बातमी पुढे आलीय. एका गर्भवती महिलेवर 5 नराधमांनी सामुहिक बलात्कार केल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडालीय. या प्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या तीन मित्रांना अटक केलीय. या घटनेमुळे त्या महिलेचा गर्भपात झाला तर तिच्या मित्राने आत्महत्या केलीय.

राजस्थानातल्या बांसवाडा इथली ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जुलैला रात्री पीडित महिला आपल्या मित्रासोबत गावाला जात होती. त्यावेळी नशेत असलेल्या आरोपींनी  महिलेच्या मित्रासोबत भांडण केलं. त्याच्यावर तलवारीने हल्लाही केला. या हल्ल्यात तो बेशुद्ध झाला. त्यानंतर आरोपींनी महिलेला उदयपूरा इथल्या बस स्टँडवरून एका अज्ञात स्थळी नेलं आणि बलात्कार केला.

आई-वडील झोपले होते घरात.. 11 महिन्यांच्या चिमुरड्याचा बादलीत पडून मृत्यू

एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या मित्रांनाही बोलावून घेतलं. आणि या पाच मित्रांनी मिळून तिच्यावर 11 वेळा बलात्कार केला आणि एका निर्जन स्थळी सोडून दिलं. या अत्याचाराने गंभीर धक्का बसलेल्या या तरुणीला नंतर काही लोकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यावेळी तिचा गर्भपात झाला होता.

शरद पवारांच्या जवळचाच नेता सोडणार साथ, दिग्गज नेत्याचा मुलगा भाजपमध्ये जाणार?

तर प्रचंड धक्का बसलेल्या तिच्या मित्राने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सुनील चरपोटा आणि त्याचे तीन मित्र विकास, गब्बू आणि कलजी याला अटक केलीय. यातला सुनील हा मुख्य आरोपी असून त्याच्यावर पाच हजारांचं इनामही आहे.

आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी विविध स्वयंसेवी संघटनांनी केली आहे. तर राजस्थानच्या महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली असून पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.

VIDEO : महापूर ओसरल्यानंतरचं भीषण दृष्य, पोल्ट्रीतील हजारो कोंबड्यांना जलसमाधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 03:03 PM IST

ताज्या बातम्या