Home /News /national /

'भाजप कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई आहे'', पोलीस स्टेशनबाहेर लागले बॅनर

'भाजप कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई आहे'', पोलीस स्टेशनबाहेर लागले बॅनर

बॅनरवर 'भाजप कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई आहे (भाजप कार्यकर्ता का ठाणे में आना मना है)' असे लिहिले होतं.

    उत्तर प्रदेश, 28 मे: यूपी, मेरठमध्ये (Meerut, UP) शुक्रवारी एक विचित्र दृश्य पाहायला मिळालं. जेव्हा लोकांनी मेडिकल स्टेशनच्या भिंतीवर एक मोठा बॅनर लटकलेला पाहिला. बॅनरवर 'भाजप कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई आहे (भाजप कार्यकर्ता का ठाणे में आना मना है)' असे लिहिले होतं. या बॅनरवर स्टेशन प्रभारी संत शरण सिंह यांचे नाव लिहिले होते. पोलीस स्टेशनबाहेर टांगलेल्या या बॅनरला ट्विट करून सपा नेते अखिलेश यादव (SP leader Akhilesh Yadav) यांनी राज्यातील योगी सरकार ताशेरे ओढले. (Banner against BJP at Meerut Medical Police Station) 'हा आहे यूपीच्या भाजप सरकारचा बुलंद इक्बाल' अखिलेश यादव यांनी ट्विट करून लिहिलं की, 'या पाच-सहा वर्षांत पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. यूपीच्या भाजप सरकारचा हा बुलंद इक्बाल आहे. भाजप कार्यकर्त्यांनी लावले होते बॅनर मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशनवर लटकवलेले बॅनर अन्य कोणी नसून खुद्द भाजप कार्यकर्त्यांनी लावले होते. भाजप कार्यकर्त्यांनी इन्स्पेक्टर संत शरण सिंह यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यातून त्यांच्या बदलीची मागणी केली. त्यानंतर पोलीस लाईनमधून पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या सीओने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांना शांत केले आणि पोलीस ठाण्याच्या भिंतीवरून वादग्रस्त बॅनर हटवला. मालमत्तेच्या वादात पोलिसांवर दबाव आणला जात होता मेरठचे एसएसपी प्रभाकर चौधरी म्हणाले की, काही अराजक घटक पोलिसांवर मालमत्ता रिकामे करण्यासाठी दबाव आणत होते. सत्ताधाऱ्यांचे नाव घेत स्वबळावर काम करण्याच्या सूचना देत होते. पोलीस ठाण्याचे पोलीस त्यांचे म्हणणे ऐकून घेत नसताना दबाव निर्माण करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या भिंतीवर वादग्रस्त बॅनर लावण्यात आले. बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल ते म्हणाले की, गोंधळ घालणाऱ्या आणि बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. व्हिडिओ फुटेजच्या आधारे पोलीस अशा लोकांची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक करतील.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Uttar pradesh news

    पुढील बातम्या