सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचा आज देशव्यापी संप

सार्वजनिक क्षेत्रातील  बॅंकांचा आज देशव्यापी संप

आॅल इंडिया बँक आॅफिसर्स कॉन्फेडरेशन, आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक वर्कर्ससह नऊ संघटनांची एकत्रित संस्था द युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने आज बॅँकांच्या संपाची हाक दिली आहे.

  • Share this:

22 ऑगस्ट: बँकांच्या विलीनीकरणाच्या सरकारच्या प्रयत्नांना विरोध आणि इतर मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आज संप करणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बहुतेक बँकांनी आपल्या ग्राहकांना या संपाची कल्पना दिली आहे.

आॅल इंडिया बँक आॅफिसर्स कॉन्फेडरेशन, आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक वर्कर्ससह नऊ संघटनांची एकत्रित संस्था द युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने आज बॅँकांच्या संपाची हाक दिली आहे. आयसीआयसीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस आणि कोटक महिंद्रा बँकेचं कामकाज धनादेशांचं क्लीअरन्स वगळता नेहमीप्रमाणे सुरू असेल.  'मुख्य कामगार आयुक्तांकडील बैठकीतून काहीही तोडगा निघालेला नाही. सरकार किंवा बँक व्यवस्थापनाकडून कोणतेही आश्वासन न मिळाल्यामुळे संप करण्याशिवाय आमच्यासमोर काहीही पर्याय राहिलेला नाही', असं एआयबीओसीचे सरचिटणीस डी. टी. फ्रॅन्को यांनी सांगितलंय.

देशभरातील 10 लाख बॅँक कर्मचारी आज संपावर जाण्याची शक्यता आहे.तसंच आज 1,32000 शाखा बंद राहणार आहे. यामुळे सामान्य माणसाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2017 09:44 AM IST

ताज्या बातम्या