वर्षभरात भारतीय बॅंकांमधून तब्बल 17 हजार कोटी रूपये लंपास

रिझर्व बँकेचा हा अहवाल बँकांच्या फ्रॉड मॉनिटरिंग विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीवर आधारित आहे. 2016-17 या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत जवळपास 17 हजार कोटी रुपये देशातल्या विविध बँकांना गमवावे लागले आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2017 01:35 PM IST

वर्षभरात भारतीय बॅंकांमधून तब्बल 17 हजार कोटी रूपये लंपास

25 डिसेंबर: या आर्थिक वर्षात आतापर्यंत देशभरातल्या बँकांमधून जवळपास 17 हजार कोटी रुपये फ्रॉड आणि तत्सम गुन्ह्यात लुटले गेले आहेत. रिझर्व बँकेच्या अहवालात हे स्पष्ट करण्यात आलंय. यामध्ये सायबर गुन्ह्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं सदर अहवालात म्हटलं गेलंय.

रिझर्व बँकेचा हा अहवाल बँकांच्या फ्रॉड मॉनिटरिंग विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीवर आधारित आहे. 2016-17 या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत जवळपास 17 हजार कोटी रुपये देशातल्या विविध बँकांना गमवावे लागले आहेत. त्यामध्ये एटीएममधून चोरीच, बँकांवर टाकलेले दरोडे आणि आतील यंत्रणेने केलेला भ्रष्टाचार, सायबर गुन्हे अशा वेगवेगळ्या कारणाने ही सर्व सामन्याची रक्कम लुटली गेली आहे.

बँकांमध्ये सर्वाधिक आर्थिक गुन्हे हे सायबर संबंधी आहेत. याबाबत रिझर्व बँकने आधीच समिती स्थापन करून बँकांमधील व्यवहार अधिक पारदर्शी कसे होतील हे पहिलंय. मात्र अद्याप पूर्ण क्षमतेनं काम होताना दिसत नाही आणि त्याबाबत सकारात्मक परिणाम सुद्धा दिसत नाहीत.

हजारो कोटींची कर्ज देऊन वसुली न झाल्यानं आधीच अनेक बँका अडचणीत आहेत, त्यात अनेक उपाययोजना होऊनही दरवर्षी हजारो कोटी रुपये अशाप्रकारेही लुटले जात आहेत. त्यामुळे आता याबातीत सरकार काय पाऊलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 01:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...