बँक आणि इतर परीक्षा होणार स्थानिक भाषेत; सरकार घेऊ शकतं निर्णय

बँक आणि इतर परीक्षा होणार स्थानिक भाषेत; सरकार घेऊ शकतं निर्णय

Banking and compitetive exam : आगामी काळात होणाऱ्या बँकेच्या आणि स्पर्धा परीक्षा या स्थानिक भाषांमध्ये होऊ शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जून : बँक, स्पर्धा परिक्षा म्हटलं की अनेकांना भाषेचा न्यूनगंड राहतो. बापरे, इंग्रजीमध्ये होणारी परीक्षा कशी पास होणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी स्थानिक भाषेत परिक्षा घ्या अशी मागणी देखील केली जात आहे. कर्नाटकसह दक्षिणेकडील राज्यांमधील खासदारांनी ही मागणी लावून धरली आहे. दरम्यान, या मागणीवर सरकार गांभीर्यांनं विचार करत आहे. त्यामुळे आगामी काळात स्पर्धा परिक्षा असोत अथवा या बँकेच्या या स्थानिक भाषेत घेण्याचा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी याबाबतची माहिती दिली. काँग्रेसचे राज्यसभा खासदार जी. सी. चंद्रशेखर यांनी शुन्यप्रहारादरम्यान हा प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे जी. सी. चंद्रशेखर यांनी आपली मागणी कन्नड भाषेतून मांडली. त्यानंतर त्याचं भाषांतर करण्यात आलं.

दुधाची पिशवी परत द्या; मिळवा इतके पैसे

काय म्हणाले चंद्रशेखर?

स्पर्धा परीक्षा अथवा बँकेच्या परीक्षा या इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये घेतल्या जातात. पण, काही गोष्टींचा विचार करता परीक्षा ही कन्नडमध्ये घेण्याची मागणी जी. सी. चंद्रशेखर यांनी केली. यावर बोलताना निर्मला सीतारामण यांनी आणखी काही खासदारांच्या मागणीकडे देखील लक्ष वेधलं. तसंच या विषयावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचं मत देखील निर्मला सीतारामण यांनी व्यक्त केलं आहे.

जी. सी. चंद्रशेखर यांनी कन्नडमध्ये केलेलं भाषण सभापती व्यंकय्या नायडू यांनी अनुवादित केलं. तसंच मान्यताप्राप्त 22 भाषांमध्ये कुणाही सदस्याला आपली बाजू मांडायची असेल किंवा भाषण करायचं असेल तर त्याबाबतची सुचना अगोदर द्यावी, त्यामुळे भाषांतर करायला वेळ मिळेल असं व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं.

VIDEO : सावधान! शाळेत जाताना तुमची मुलं तर करत नाहीये ना असा प्रवास ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: exam
First Published: Jun 27, 2019 03:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading