Home /News /national /

चोराने फक्त 2 मिनिटांत बँक लुटली, 9 लाख रुपये केले लंपास

चोराने फक्त 2 मिनिटांत बँक लुटली, 9 लाख रुपये केले लंपास

दरोडेखोराने 2 मिनिटांत कोणालाही जखमी न करता, कोणताही गोंधळ न करता तब्बल 9 लाख रुपयांची रोकड लंपास केली.

    पाटणा, 01 जानेवारी : दरोडेखोरानं हातात कोणतंही शस्त्र नसताना बँक लुटल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. दरोडेखोराने 2 मिनिटांत कोणालाही जखमी न करता, कोणताही गोंधळ न करता तब्बल 9 लाख रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे त्याच्याकडे कोणतंच हत्यार नसल्याचं सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर समोर आलं आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ही घटना घडली. याबद्दल पोलिसांनी सांगितले की, दुपारच्या वेळेत दरोडेखोर बँकेच्या शाखेमध्ये आला. त्यानंतर बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याने धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर बँकेतून 9 लाख रुपयांची रोकड घेऊन तो पळाला. बँकेवर दरोडा पडल्याची ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. यामध्ये दरोडेखोर रोकड पिशवीमध्ये भरताना दिसत आहे. त्याच्याकडे यावेळी कोणत्याही प्रकारचं शस्त्र  नव्हतं. त्याने फक्त आपल्याकडं शस्त्र असल्याचं भासवल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून दिसत आहे. दरोडेखोर दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी बँकेत आला आणि बँक लुटल्यानंतर तो 3 वाजून 4 मिनिटांत पळूनही गेला. दरोडेखोर बँकेत येण्याच्या एक मिनिट आधी वीज गेली होती. त्यानंतर वीज आली तेव्हा तो कॅश काउंटरवर पोहचला. अशा पद्धतीने त्याने हातात कोणतंही शस्त्र नसताना बँक लुटली. बँकेवर दरोडा पडला तेव्हा सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नव्हते. सध्या या प्रकऱणाचा तपास पोलीस करत आहेत. या दरोड्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा हात आहे का याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, बँक मॅनेंजरनी म्हटलं की, हे सगळं इतक्या कमी वेळात झालं की काहीच समजलं नाही.
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या