मुंबई, 21 जुलै: सॉफ्ट पोर्नोग्राफीच्या (Soft Porn) प्रकरणात अडकलेला उद्योजक राज कुंद्राला (Raj Kundra) न्यायालयानं 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत (Police custody) ठेवण्याचे आदेश दिले असून याप्रकरणात आरोपींच्या खात्यावर लाखो रुपये जमा केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपी सॉफ्ट पॉर्न प्रकारातील व्हिडिओ हॉटहिट (HotHit Company) कंपनीला देत असत आणि त्या बदल्यात त्यांच्या खात्यावर लाखो रुपये जमा केले जात असल्याचं बँक रेकॉर्डवरून दिसून आलं आहे.
अव्वाच्या सव्वा कमाई
सॉफ्ट पॉर्न बनवून विकणाऱ्यांना हॉटहिट कंपनीकडून दर दिवसाला लाखो रुपये मिळत असल्याचा दावा ‘झी न्यूज’च्या बातमीत करण्यात आला आहे. हाती लागलेल्या रेकॉर्डनुसार आऱोपीच्या खात्यावर जमा झालेल्या रकमेचे तपशील थक्क करणार आहेत.
असे व्यवहार समोर आले आहेत.
हे वाचा -पोर्नोग्राफी आणि हिंदू पुराणकथांबाबत राज कुंद्राने केलेली जुनी Tweets झाली VIRAL
राज कुंद्राचं स्पष्टीकरण
आपण 25 हजार डॉलर्सना कंपनी विकून टाकली होती, त्यामुळे त्यानंतर कंपनीनं कशा प्रकारचे व्हिडिओ बनवले याच्याशी आपला संबंध नसल्याचं राज कुंद्रानं म्हटलं आहे. मात्र कंपनी विकल्यानंतर कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये राज कुंद्रा सक्रिय असल्याचे आणि कंपनीच्या सर्व महत्त्वाच्या निर्णयात त्याचा सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Porn video, Raj kundra