बेळगांवमध्ये बँक आॅफ महाराष्ट्रमधून 12 लाख लांबवले

बेळगांवमध्ये बँक आॅफ महाराष्ट्रमधून 12 लाख लांबवले

काही लोकांनी कॅश काढण्यासाठी बँकेत प्रवेश केला आणि 12 लाख रुपये लांबवले. घटना झाल्याच्या दोन तासांनतर चोरी झाल्याचं लक्षात आलं.

  • Share this:

07जुलै : बेळगावातील किर्लोस्कर रोड बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत कॅशियर कडून 12 लाख रुपये चोरी केल्याची घटना घडलीय.

गुरुवारी सकाळी बेळगाव बाहेरील काही लोकांनी कॅश काढण्यासाठी बँकेत प्रवेश केला आणि 12 लाख रुपये लांबवले. घटना झाल्याच्या दोन तासांनतर चोरी झाल्याचं लक्षात आलं. नुकतंच बँकेचं रिनोव्हेशन करण्यात आलं असून बॅंक जनतेसाठी काही दिवसांपूर्वीच ओपन करण्यात आली होती.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडे दहाच्या सुमारास पाच ते सहा जण बँकेत आले होते. एक एकाने सर्व कर्मचाऱ्यांना माहिती विचारत व्यस्त केलं. त्यातील एकानं मागील बाजूनं कॅश काउंटरमध्ये घुसून 12 लाख रुपये लांबवलेत. सी.सी.टी.व्हीमध्ये हा प्रकार कैद झाला असून चोरट्यांचा शोध पोलीस घेतायंत. खडे बाजार पोलिसांत गुन्ह्याची नोंद झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2017 08:53 AM IST

ताज्या बातम्या