नवी दिल्ली, 1 जुलै : बँका त्यांची कर्जवसुली करण्यासाठी कर्जदारांकडे बऱ्याच वेळा बाउन्सर्स पाठवतात. कर्जदारांकडून वेळेत कर्जवसुली होत नसेल तर बँकांनी त्यांच्यावर केलेला हा जालीम उपाय असतो. पण आता मात्र या पद्धतीवर बंदी येणार आहे.केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेमध्ये याबद्दल भाष्य केलं. कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जवसुली करण्यासाठी बाउन्सर्स पाठवण्याचे अधिकार नाहीत, असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.
...म्हणून मोदींनी केलं बिग बी अमिताभ यांचं कौतुक, शेअर केला हा VIDEO
एखाद्या कर्जदाराकडून कर्जाची परतफेड करायला उशीर होत असेल तर त्याला यासंबंधी सूचना देण्याचे अधिकार बँकेला आहेत. पण पोलीस पडताळणी आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच बँका कर्जवसुलीसाठी एजंट्स पाठवू शकतात अशा स्पष्ट सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत याची अनुराग ठाकूर यांनी आठवण करून दिली. एका प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, कर्जवसुलीसाठी बाउन्सर्सना पाठवण्याचा अधिकार बँकांना नाही.
काय आहेत RBI च्या सूचना ?
कर्जदारांशी नि:पक्षपातीपणे व्यवहार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. देशभरातल्या सगळ्याच बँकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याची गरज आहे. कर्जदारांचं कोणत्याही प्रकारे शोषण करण्याचा बँकेला अधिकार नाही. ज्या बँका या सूचनांचं पालन करणार नाहीत त्या बँकांवर कारवाई केली जाईल. कर्जदारांशी अशा प्रकारे आक्षेपार्ह वर्तन केल्यास रिझर्व्ह बँक त्या बँकेवर बंदी आणू शकतं, हेही अनुराग ठाकूर यांनी लक्षात आणून दिलं.
================================================================================================
ठाणे स्टेशनवरच्या जीवघेण्या गर्दीचा VIDEO व्हायरल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा