लवकर उरकून घ्या तुमची कामं; कारण या चार दिवशी बँका बंद

लवकर उरकून घ्या तुमची कामं; कारण या चार दिवशी बँका बंद

सलग चार दिवस सुट्ट्या असल्यानं बँकांची कामं लवकर उरकून घ्या.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : होळी सण आता तोंडावर आल्यानं सर्वत्र लगभग पाहायला मिळत आहेत. शिवाय सलग सुट्ट्या असल्यानं अनेकांनी वीकएंड एन्जॉय करण्यासाठी योजना आखण्यासही सुरुवात केली आहे. पण, या काळात जर का तुमची बँकांशी संबंधित काही महत्त्वाची कामं असतील तर ती लवकर उरकून घ्या. नाहीतर तुम्हाला 24 मार्च पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण, 19 मार्च पूर्वी जर का तुम्ही तुमची कामं उरकली नाहीत तर तुम्हाला 24 मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल. 20 ते 24 मार्चपर्यंत बँका बंद असणार आहेत. त्यामुळे या चार दिवसांमध्ये बँकांचा व्यवहार करता येणार नाहीत. प्रत्येक राज्यात बँकांच्या सुट्ट्या या वेगवेगळ्या असतात.

संपूर्ण देशात केवळ राष्ट्रीय सुट्ट्यांदिवशीच बँका बंद असतात. 20 आणि 21 तारखेला होळीची सुट्टी असणार आहे. 20 मार्चला बुधवार असून या दिवशी देहरादून, कानपूर, लखनऊ आणि रांचीमध्ये सुट्टी असणार आहे. 21 मार्च रोजी गुरूवार असून या दिवशी जवळपास सर्वच राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे. या दिवशी धुळवड खेळली जातं. 22 मार्चला बिहार डे आहे. यादिवशी बिहारमधील बँकांना सुट्टी असणार आहे. 23 मार्चला चौथा शनिवार आणि 24 मार्चला रविवार असल्यानं साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे 21 ते 24 मार्च पर्यंत बँक बंद असणार आहे. तर, या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमची कामं उरका किंवा तसा प्लान करा.

 SPECIAL REPORT: नेते राजकारणात मश्गुल; निवडणुका जात आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून दूर

First published: March 18, 2019, 10:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading