आधार कार्ड बँक खात्यांना जोडण्यास बँक कर्मचाऱ्यांचा विरोध

बँक खात्याशी आधारकार्ड लिंक करण्याचा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलाय. हा आदेश मान्य करण्यास देशातील बँकांनी नकार दिलाय.

बँक खात्याशी आधारकार्ड लिंक करण्याचा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलाय. हा आदेश मान्य करण्यास देशातील बँकांनी नकार दिलाय.

  • Share this:
24 आॅक्टोबर : बँक खात्याशी आधारकार्ड लिंक करण्याचा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलाय. हा आदेश मान्य करण्यास देशातील बँकांनी नकार दिलाय. नोटाबंदीनंतर आता हा एक नवाच वाद उभा राहिलाय. देशातील सर्व बँकांची खाती आधारसोबत लिंक करावी यासाठी आरबीआयने परिपत्रक काढलंय. त्याचप्रमाणे नवे आधार कार्ड काढण्याची जबाबदारीही बँक कर्मचाऱ्यांवर टाकण्यात आलीय. या दोन्ही गोष्टींना बँक कर्मचारी आणि बँक युनियनने विरोध केलाय. देशात सायबर सिक्युरिटी मजबूत नसताना बँक आधारसोबत जोडणं अयोग्य असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. एकतर बँकांमध्ये कमी मनुष्यबळ आणि ग्राहकांच्या प्रायव्हसीवर घाला, हे मुद्दे बँक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेत. काय आहे बँक कर्मचाऱ्यांची भूमिका ? - आधारला बँकांसोबत जोडायला विरोध करणारी आरबीआय आधारची सक्ती का करतेय? - बँक खाते उघडण्याची जबादारी आऊटसोर्स केली होती, मग आता कर्मचाऱ्यांवर बोजा का ? - बँक कर्मचाऱ्यांची कमतरता - बँक खात्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? - ग्राहकांच्या प्रायव्हसीवर हल्ला?
First published: