Home /News /national /

थेट रामलल्लांच्या अकाउंटमधूनच पैसे लाटले! रामजन्मभूमी ट्रस्टला मिळालेले पैसे खोट्या चेकने लंपास

थेट रामलल्लांच्या अकाउंटमधूनच पैसे लाटले! रामजन्मभूमी ट्रस्टला मिळालेले पैसे खोट्या चेकने लंपास

थेट रामलल्लांसाठी असलेल्या खात्यातूनच पैसे लंपास झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंत खोटे चेक देऊन सुमारे 6 लाख रुपयांची रक्कम परस्पर काढल्याचं उघड झालं आहे.

    अयोध्या, 10 सप्टेंबर : अयोध्येत राम मंदिराच्या कामाला प्रत्यक्षात सुरू झाली नसली, तरीही लोकांकडून मंदिराच्या ट्रस्टला मोठ्या प्रमाणात देणग्या मिळत आहे. मात्र, देणग्या स्वीकारण्यासाठी उघडण्यात आलेल्या ट्रस्टच्या बँक खात्यातूनच जमा झालेली रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली समोर आली आहे. फसवणूक करून लाखो रुपये काढण्यात आले. चोरट्यांनी क्लोन चेकचा वापर करून ही रक्कम काढल्याचं वृत्त आहे. थेट रामलल्लांसाठी असलेल्या खात्यातूनच पैसे लंपास झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंत खोटे चेक देऊन सुमारे 6 लाख रुपयांची रक्कम परस्पर काढल्याचं उघड झालं आहे. या चोराने तिसऱ्यांदा खात्यातून पैसे काढायचा प्रयत्न केला, तेव्हा ट्रस्टचे सेक्रेटरी चंपट राय यांना फोनवरून कळवण्यात आलं. त्यावेळी हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं उघडकीला आलं. बुधवारी रात्री उशिरा या प्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. राम जन्मभूमी ट्रस्टने लोकांनी राम मंदिरासाठी दिलेल्या देणग्या स्वीकारण्यासाठी एक खातं बँक ऑफ बरोडाच्या लखनौ शाखेत उघडलं आहे. या खात्यातून 1 सप्टेंबरला दीड लाख रुपये काढण्यात आले. दोन दिवसांनंतर साडेतीन लाख या खात्यातून वळते झाल्याचं लक्षात आलं. तिसऱ्यांदा या खात्यातून 9.86 लाख रुपये काढण्यासाठी जेव्हा चेक बँकेत जमा झाला, तेव्हा लखनौ शाखेतल्या कर्मचाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी खात्री करण्यासाठी ट्रस्टला फोन केला. रामजन्मभूमी ट्रसचा कारभार पाहणाऱ्या कुणीच असे चेक दिले नसल्याचं तेव्हा लक्षात आलं आणि हा फसवणुकीचा प्रकार उजेडात आला. ट्रस्टे सचिव चंपत राय यांनी लखनौच्या खात्यातून सहा लाख रुपये गायब असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणी अयोध्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या तक्रारीनुसार, दीड लाख आणि साडेतीन लाख रुपये काढण्यासाठी ट्रस्टच्या नावाने खोटे चेक बँकेला देण्यात आले. तिसऱ्यांदा मोठी रोख रक्कम काढायचा प्रयत्न झाला, त्या वेळी ही फसवणूक असल्याचं लक्षात आलं. अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या