पुलवामासारख्याच हल्ल्याची आखली होती योजना, दहशतवादी गजाआड

पुलवामासारख्याच हल्ल्याची आखली होती योजना, दहशतवादी गजाआड

काश्मीरमध्ये शनिवारी एका कारमध्ये स्फोट घडवून आणला होता.

  • Share this:

शोपियान, 1 एप्रिल : बनिहाल शहरापासून काही अंतरावर एका कारमध्ये स्फोट घडवून आणल्याप्रकरणी ओवैस अमीन राथेर याला पोलिसांनी अटक केली आहे. शोपियान जिल्ह्यातील वैल गावात राहणाऱ्या ओवैसला एका तपास पथकाने ताब्यात घेतले. तो एका वाहनातून पळून जाण्याच्या तयारीत होता.

गेल्या शनिवार जम्मूकडे जाणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या वाहनांचा ताफा गेल्यानंतर काही वेळातच एका कारमध्ये स्फोट झाला होता. यात सीआरपीएफच्या एका वाहनाचं नुकसानही झालं. त्यानंतर कारचा चालक पळून जाण्यात यशस्वी झाला.

ओवेसला बनिहाल येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 8 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची ओळख पटण्यासाठी सीसीटीव्ही फूटेजची मदत झाली. तसेच त्याच्या चेहऱ्यावर आणि शरिरावर झालेल्या जखमांमुळे संशयातून त्याला ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान, घटनास्थळी मिळालेल्या पत्रावरून चालकाचे नाव समजले होते. तो हिजबुल मुजाहिद्दीनचा सदस्य ओवैस अमीन असल्याचे समोर आले होते. त्यात पुलवामात झालेल्या हल्ल्यासारखाच आणखी एक हल्ला करण्याचा उल्लेख होता.

VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 09:28 PM IST

ताज्या बातम्या