गर्लफ्रेंडनं शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून वाढदिवशीच गळफास घेत तरुणानं संपवलं जीवन

गर्लफ्रेंडनं शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून वाढदिवशीच गळफास घेत तरुणानं संपवलं जीवन

भांडणाचा राग विसरून ती किमान वाढदिवशीच फोन करेल असा विश्वास तरुणाला होता.

  • Share this:

बंगळुरू, 29 फेब्रुवारी : वाढदिवशीच फोन केला नाही म्हणून 25 वर्षांच्या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे बांदाहल्ली गावात खळबळ उडाली. बांदाहल्ली गावात राहणाऱ्या एम. शिवाकुमारचे तरुणीसोबत ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर तिचा वाढदिवशीच फोन न आल्यानं निराशेतून त्याने टोकाचं पाऊल उचललं. वाढदिवशी किमान ती आपल्याला फोन किंवा मेसेज करेल अशी आशा होती. मात्र त्याची आशा फोल ठरल्यानं निराश होऊन त्याने राहत्या घरीच गळफास घेतला.

एम. शिवाकुमारकडे त्याच्या मालकीची टॅक्सी आहे. कामानिमित्तानं तो येलाहंका इथे राहात होता. त्यावेळी त्याचे शेजारी असणाऱ्या तरुणीसोबत प्रेम जुळलं. दोघंही आनंदात होते. त्यांच्या प्रेमालाही कुटुंबियांनी स्वीकारलं होतं. मात्र आईची तब्येत बिघडल्यानं एम. शिवकुमारला त्याच्या गावी जाणं भाग होतं. त्यावरू त्याचे प्रेयसीसोबत खटके उडायला सुरुवात झाली. आई आजारी झाल्यानं शिवकुमारला तातडीनं गावी जावं लागलं तर तरुणाला गावी येण्यात रस नव्हता. या कारणावरून त्यांच्यात बरेच वाद झाले आणि ब्रेकअप झालं.

हेही वाचा-कॅमेऱ्याचा अ‍ॅंगल आवडला नाही म्हणून भर मांडवात व्हिडीओग्राफरची गोळया झाडून हत्या

26 फेब्रुवारीला शिवकुमारचा वाढदिवस होता. सगळं विसरून किमान ती परत येईल अशी एक आशा त्याला होती. तो तिच्या फोन आणि मेसेजची वाट पाहात होता. मात्र शेवटपर्यंत तिने त्याला कोणताही फोन किंवा मेसेज केला नाही. याच नैराश्येतून त्यानं स्वत:ला खोलीत कोंडून घेत रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीला शिवकुमारसोबत रिलेशन ठेवण्यात स्वारस्य नव्हतं. त्यामुळे तिने तो गावी गेल्यानंतरही त्याला फोन किंवा मेसेज केला नाही. मात्र तरीही शिवकुमारने ती परत येईल ही आशा सोडली नव्हती. मात्र त्याच्या सगळ्या आशा खोट्या ठरल्यानं त्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवकुमारच्या रुममध्ये सुसाईड नोट सापली. ज्यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलं आहे.

हेही वाचा-लग्नात गिफ्टच्या बहाण्यानं आला प्रियकर, पुढे असं काही घडलं की सगळे पाहातच राहिले

First published: February 29, 2020, 3:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading