Home /News /national /

Bank Fraud : बँकेची 10 हजार कोटींची फसवणूक करून भारतात लपले होते बांगलादेशी, EDने केली अटक

Bank Fraud : बँकेची 10 हजार कोटींची फसवणूक करून भारतात लपले होते बांगलादेशी, EDने केली अटक

ED arrested Bangladeshis : त्यांच्या देशात 10 हजार कोटींची बँकेची फसवणूक करून हे बांगलादेशी भारतात व्यवसाय करत होते. अशा 6 बांगलादेशींना EDने अटक केली आहे.

  कोलकाता, 15 मे : ईडीने पश्चिम बंगालमधील सुमारे 11 ठिकाणी छापे टाकले आणि भारतात बेकायदेशीरपणे लपलेल्या 6 बांगलादेशी नागरिकांना अटक (ED arrested Bangladeshis) केली. आरोपी प्रशांत कुमार हलदार उर्फ ​​पीके हलदार याच्यावर बांगलादेशमध्ये 10,000 कोटी रुपयांची (भारतीय रुपये 8.940 कोटी) बँकेची फसवणूक (Bank Fraud) केल्याचा आरोप आहे आणि तो बनावट कागदपत्रं  (Bangladeshis made fake documents in India) बनवून भारतात लपला होता. 5 मित्रांनी साथ दिली आरोपी पीके हलदर याच्याकडे पश्चिम बंगालच्या पत्त्यावर बनावट रेशनकार्ड, मतदार कार्ड, पॅनकार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्टही मिळाला. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपीने भारतात कंपन्याही उघडल्या असून त्यात स्वपन मैत्रा, उत्तम मैत्रा, इमाम हुसैन, आमना सुलताना आणि पर्नेश कुमार हलदार हे आणखी 5 आरोपी होते, अशीही माहिती ईडीच्या चौकशीत समोर आली आहे. पी के हलदार
  पी के हलदार
  अनेक देशांचे पासपोर्ट मुख्य आरोपी पीके हलदार याच्याकडे केवळ बांगलादेश आणि भारताचेच पासपोर्ट नसून कॅरेबियनमधील ग्रेनाडा देशाचाही पासपोर्ट आहे आणि त्याने बांगलादेशमध्ये फसवणूक करून अनेक देशांमध्ये हे पैसे लपवून ठेवल्याचंही तपासात उघड झालं आहे. हे वाचा - दोन भावांचं झालं एका मांडवात लग्न; पण या मागणीसाठी वधूंनी गाठलं पोलीस ठाणे इंटरपोलने नोटीस बजावली होती बांगलादेशमध्ये बँकेची फसवणूक करून पीके हलदार त्याच्या साथीदारांसह फरार झाला. त्यानंतर बांगलादेश पोलिसांच्या आदेशानुसार इंटरपोलने जानेवारी 2021 मध्ये आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. आरोपी कॅनडात लपून बसला आहे आणि तिथे त्याने एक कंपनीही उघडली आहे, अशी बातमी मध्यंतरी आली होती. पण आता भारतात आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी भारतात कसा आणि कोणत्या मार्गाने आला याचाही तपास एजन्सी करत आहे. तसंच, कोणकोणत्या लोकांनी त्याला मदत केली आणि बनावट कागदपत्रे तयार करून दिली, याचाही शोध घेतला जात आहे.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Bangladesh, Financial fraud

  पुढील बातम्या