तृणमूलच्या प्रचारात का आले बांग्लादेशी कलाकार? भाजपचा ममतांना सवाल

लोकसभेच्या निवडणुकीत यावर्षी काही कलाकार उमेदवार आहेत तर काही कलाकारांना प्रचारासाठी बोलवलं जात आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी बंगाली चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्यांना उमेदवारी दिली आहे. पण त्यांच्या प्रचारसभांमध्ये बांग्लादेशी कलाकार आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2019 07:25 PM IST

तृणमूलच्या प्रचारात का आले बांग्लादेशी कलाकार? भाजपचा ममतांना सवाल

कोलकाता, 16 एप्रिल : लोकसभेच्या निवडणुकीत यावर्षी काही कलाकार उमेदवार आहेत तर काही कलाकारांना प्रचारासाठी बोलवलं जात आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी बंगाली चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्यांना उमेदवारी दिली आहे. पण त्यांच्या प्रचारसभांमध्ये बांग्लादेशी कलाकार आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

बांग्लादेशमधले लोकप्रिय कलाकार फिरदोस यांनी रविवारी ममतांच्या तृणमूल काँग्रेसचा प्रचार केला होता. त्यातच आता गाझी अबदून नूर हे अभिनेतेही ममतांच्या प्रचारात दिसले.

तृणमूल काँग्रेसचे दमदमचे उमेदवार सौगात रॉय यांच्यासाठी बांग्लादेशी अभिनेते अबदून नूर यांनी प्रचार केला. 71 वर्षांचे सौगात रॉय हे 2009 पासून पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्या प्रचारात बांग्लादेशी कलाकारांची गरज काय, असा प्रश्न विरोधकांनी विचारला आहे.

व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन?

बांग्लादेशी कलाकारांच्या सहभागाबद्दल गृहमंत्रालयाने याबदद्ल एक अहवाल मागवला आहे. व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन करून हे कलाकार इथल्या प्रचारात कसे काय आले, अशीही विचारणा झाली आहे.

Loading...

एका राजकीय पक्षाने आपल्या प्रचारासाठी परदेशी नागरिकत्व असलेल्या व्यक्तीला बोलवणं हे आक्षेपार्ह आहे, असं भाजपचे नेते दिलीप घोष यांनी म्हटलं आहे. याआधी असं झालेलं मी कधीच ऐकलं नव्हतं, अशी टिप्पणीही त्यांनी केली. ममतांच्या तृणमूल काँग्रेसला प्रचारासाठी भारतातले कलाकार मिळत नाहीत का, असा सवालही दिलीप घोष यांनी विचारला.

'उद्या इम्रान खानलाही बोलवाल'

उद्या ममता बॅनर्जी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना प्रचारासाठी बोलवलं तर चालेल का, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

बांग्लादेशी कलाकार फिरदौस यांना रायगंजमध्ये प्रचारासाठी बोलवण्यात आलं होतं. ते बांग्लादेशचे प्रसिद्ध कलाकार असल्यामुळेच आम्ही त्यांना रोड शो साठी बोलवलं होतं, असं स्पष्टीकरण तृणमूल काँग्रेसने दिलं आहे. पण यामुळे परदेशी नागरिकांनी भारतात येऊन निवडणूक प्रचार करण्याबद्दल चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

==============================================================================================================================================================================================

SPECIAL REPORT : उर्मिलांच्या प्रचारात 'मोदी-मोदी' घोषणा देऊन कुणी घातला राडा?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2019 07:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...