Bangalore violence: ...आणि मंदिराला वाचवण्यासाठी मुस्लीम तरुणांनी तयार केली मानवी साखळी, VIDEO VIRAL

Bangalore violence: ...आणि मंदिराला वाचवण्यासाठी मुस्लीम तरुणांनी तयार केली मानवी साखळी, VIDEO VIRAL

बंगळुरूत झालेल्या जातीय हिंसाचारात हिंसक जमावाने एका मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुस्लीम तरुणांनी केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे.

  • Share this:

बंगळुरू, 12 ऑगस्ट : कर्नाटकची राजधानी बंगळुरूत (Bengaluru Violence) मंगळवारी रात्री जातीय हिंसाचार (Communal Violence) भडकला. उत्तर बंगळुरुच्या पुलकेशी नगर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार (Congress MLA Srinivas Murthy) अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या नातेवाईकाने प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी सोशल मीडियावर एक अपमानास्पद पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला. यानंतर या भागात गोळीबारही झाला. या गोळीबारात 2 जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, यावेळी हिंसक जमावाने एका मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुस्लीम तरुणांनी या मंदिरासमोर मानवी साखळी तयार केली, आणि मंदिराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्यापासून वाचवले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या 19 सेकंदाच्या व्हिडीओ पाहून लोकं या तरुणांचे कौतुक करत आहेत.

वाचा-आक्षेपार्ह पोस्टमुळे भडकला हिंसाचार, गोळीबारात 2 ठार तर 60 पोलीस जखमी

वाचा-धावत्या बसने अचानक घेतला पेट, लहान बाळासह 4 जणांचा होरपळून मृत्यू; 27 जखमी

काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की हिंसक जमाव मंदिरालाच्या दिशेने येत असताना काही मुस्लीम तरुणांना मंदिरासमोर मानवी साखळी तयार करण्यात सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये हे तरुण जमावाला, "अल्लाहसाठी तरी हे करू नका", असे सांगताना ऐकू येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी मी आमदाराचा पुतण्या असल्याचं सांगणाऱ्या नवीन नावाच्या एका युवकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता माझं फेसबूक अकाऊंट हॅक झाली असल्याची माहिती त्याने दिली. मी कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केली नसल्याचं नवीनने पोलिसांना सांगितलं. दरम्यान, यात अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह 60 पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यामुळे बेंगळुरूमध्ये सीआरपीसीचा कलम 144 लागू करण्यात आला आहे तर या प्रकरणी आतापर्यंत 110 लोकांना अटक करण्यात आली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 12, 2020, 10:06 AM IST
Tags: violence

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading