Home /News /national /

काँग्रेस आमदाराच्या मुलाने बाईक-ऑटोला ठोकली तब्बल 4 कोटींची कार, गार्डकडून कबूल करून घेतला गुन्हा

काँग्रेस आमदाराच्या मुलाने बाईक-ऑटोला ठोकली तब्बल 4 कोटींची कार, गार्डकडून कबूल करून घेतला गुन्हा

मोहम्मद नलपद याच्या गार्डने पोलीस ठाण्यात येऊन स्वत: गुन्हा कबूल केला. मात्र प्रत्यक्ष साक्षीदारांनी त्याची पोलखोल केली.

  बंगळुरू,12 फेब्रुवारी : कर्नाटकातील काँग्रेस आमदार एन. ए. हारिस यांचा मुलगा मोहम्मद नलपद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नलपदने आपली बेन्टली कार बाईक आणि ऑटोरिक्षाला ठोकली आणि तिथून पसार झाला. या घटनेत बाईकस्वार आणि ऑटो ड्रायव्हर दोघंही गंभीर जखमी झालेत. ज्या कारने नलपदनं बाईक आणि ऑटोला ठोकलं, त्या कारची किंमत तब्बल 4 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे. कदाचित ही कार नलपदला चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण आपण केलेला हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नलपदविरोधात पोलिसांकडे साक्षीदार आहेत. या घटनेनंतर बंगळुरू वाहतूक पोलिसांनी नलपदला नोटीस पाठवली आणि चौकशीसाठी बोलावलं. वाहतूक पोलिसांनी सांगितल्यानुसार, दुर्घटना झाली त्यावेळी नलपद गाडी चालवत होतो, त्याने गाडी दुसऱ्या गाड्यांना ठोकल्यानंतर ती मागे घेतली आणि गाडीतून बाहेर येऊन पळून गेला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी नलपदचा गार्ड स्वत: पोलिसांजवळ पोहोचला आणि त्याने घटना घडली तेव्हा आपण कार चालवत असल्याचं सांगितलं आणि स्वत: गुन्हा कबूल केला. अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. सहपोलीस आयुक्त बीआर रवीकांत गौडा यांनी सांगितलं, दुर्घटनेवेळी ड्रायव्हरच्या सीटवर नलपदच बसला होता, हे सिद्ध होईल असे ठोस साक्षीदार पोलिसांकडे आहेत. नलपद आणि त्यांच्या वडिलांकडून माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. याआधीही नलपदला मारहाणीच्या आरोपात अटक झाली होती. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका झाली.
  अन्य बातम्या रोहित पवारांची आमदारकी धोक्यात? न्यायालयाची नोटीस जारी
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Crime

  पुढील बातम्या