मराठी बातम्या /बातम्या /देश /

PETA वर बंदी घाला, अमूलचं पंतप्रधानांना पत्र, षडयंत्राचाही आरोप

PETA वर बंदी घाला, अमूलचं पंतप्रधानांना पत्र, षडयंत्राचाही आरोप

PETA देशातील डेअरी सेक्टरला (Dairy sector) बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अमूलने केला आहे.

PETA देशातील डेअरी सेक्टरला (Dairy sector) बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अमूलने केला आहे.

PETA देशातील डेअरी सेक्टरला (Dairy sector) बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अमूलने केला आहे.

  नवी दिल्ली, 2 जून : देशातील मोठ्या डेअरी प्रोडक्ट्स कंपन्यांमध्ये सामिल असलेल्या अमूलने (Amul) पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi), प्राण्यांसाठी आवाज उठवणाऱ्या पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स अर्थात PETA वर बंदी आणण्याची मागणी केली आहे. पेटा देशातील डेअरी सेक्टरला (Dairy sector) बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अमूलने केला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अमूलचे उपाध्यक्ष वालमजी हुंबल (Amul vice-chairman Valamji Humbal) यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. मोदींना लिहिलेल्या पत्रात, PETA वर देशातील डेअरी सेक्टरची प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच, देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) डेअरी सेक्टरचं मोठं महत्त्वपूर्ण योगदान आहे. परंतु अशा स्वयंसेवी संस्थेमार्फत पसरवल्या जात असलेली चुकीची माहितीमुळे जीडीपीवर वाईट परिणाम होऊ शकतो, असंही त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे. हा देशातील डेअरी उद्योगाला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न आहे. परदेशी कंपन्यांच्या आदेशानुसार, त्यांच्या इशाऱ्यानुसार हे घडत आहेत की काय असं सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. PETA चं खरं उद्दिष्ट मल्टिनॅशनल कंपन्यांना मदत करणं आहे, जे सिंथेटिक मिल्कचं (Synthetic Milk) प्रोडक्शन करतात. डेअरी इंडस्ट्रीशी संबंधित देशातील जवळपास 10 कोटी लोक दुधासाठी प्राण्यांसह कोणत्याही प्रकारची क्रूरता, कोणतंही क्रूर कृत्य करत नाहीत, असंही ते म्हणाले.

  (वाचा - आयुर्वेदाच्या मदतीने 600 रुग्ण कोरोनामुक्त; रामदेव बाबा-IMA वादावेळी मोठी अपडेट)

  यावर PETA इंडियाचे CEO मणिलाल वालियेत (PETA India’s CEO Dr Manilal Valliyate) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्राण्यांबद्दल लोकांनी व्यक्त केलेल्या चिंतेकडे अमूल लक्ष देऊ इच्छित नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. अशाप्रकारे घाबरवल्याने वस्तूस्थिती बदलणार नाही, की जगभरात व्हेगन फूड लोकप्रिय होत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या