मराठी बातम्या /बातम्या /देश /

या गावात चप्पल घालण्यास बंदी, गावकऱ्यांनी नियम मोडल्यास होते कठोर शिक्षा; जाणून घ्या त्यामागचं शास्त्र

या गावात चप्पल घालण्यास बंदी, गावकऱ्यांनी नियम मोडल्यास होते कठोर शिक्षा; जाणून घ्या त्यामागचं शास्त्र

या गावातील एकही व्यक्ती पायात चप्पल घालत (Tamil Nadu villagers don’t wear footwear) नाही. शूज आणि चप्पल घालण्याचे नाव जरी काढले तरी इथले लोक संतापतात.

या गावातील एकही व्यक्ती पायात चप्पल घालत (Tamil Nadu villagers don’t wear footwear) नाही. शूज आणि चप्पल घालण्याचे नाव जरी काढले तरी इथले लोक संतापतात.

या गावातील एकही व्यक्ती पायात चप्पल घालत (Tamil Nadu villagers don’t wear footwear) नाही. शूज आणि चप्पल घालण्याचे नाव जरी काढले तरी इथले लोक संतापतात.

तमिळनाडू, 21 ऑगस्ट: आपल्या देशामध्ये प्राचीन रुढी परंपरा यांचं मोठं स्थान आहे. आजही हजारो खेड्या-पाड्यांमध्ये विविध प्रकारच्या परंपरांचं (Old traditions) पालन केलं जातं. तमिळनाडूतील एका गावात अशीच एक विचित्र प्रथा पाळली जाते. साधारणपणे आपण कुठे बाहेर जायचे असेल, तर पायात चप्पल किंवा शूज घालतो म्हणजे घालतोच. मात्र, या गावातील एकही व्यक्ती पायात चप्पल घालत (Tamil Nadu villagers don’t wear footwear) नाही. शूज आणि चप्पल घालण्याचे नाव जरी काढले तरी इथले लोक संतापतात. कॅच न्यूज या हिंदी वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तमिळनाडूतील मदुराई शहरापासून २० किलोमीटर अंतरावर कलिमायन (TN Kalimayan village tradition) नावाचं गाव आहे. या गावातील लोकांना चप्पल घालण्यास मनाई आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी हा नियम लागू आहे. आपण जर या गावाला भेट दिली तर, अगदी लहान-लहान मुलं देखील अनवाणी (TN villagers stay barefoot) पायांनी इकडे-तिकडे फिरताना दिसतात. जर चुकून एखाद्याने चप्पल घातलीच, तर त्याला कठोर शिक्षा दिली जाते. नियम मोडणाऱ्यांना कुठल्या प्रकारची शिक्षा दिली जाते याबाबत मात्र माहिती उपलब्ध झाली नाही.

अ‍ॅमेझॉनवरुन Online विष मागवलेल्या तरुणाचा मृत्यू; आई-वडिलांनी उचललं हे पाऊल

चप्पल न घालण्यामागे या गावातील लोकांचे स्वतःचे काही तर्क आहेत. या गावातील लोकं शतकानुशतके ‘अपाच्छी’ नावाच्या देवतेची पूजा करतात. हीच अपाच्छी देवता सगळ्या संकटांपासून त्यांचे रक्षण करते, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. आपला विश्वास आणि श्रद्धा पाळण्यासाठी हे लोक गावाच्या हद्दीत पादत्राणं (Villagers don’t wear footwear in town) वापरत नाहीत. गावातील ज्येष्ठ लोकांची पिढी तर ही प्रथा पाळतेच मात्र, नवीन सुशिक्षित लोक देखील आनंदाने या प्रथेचं पालन करतात. अनेक पिढ्यांपासून या गावातील लोक ही परंपरा पाळत आले आहेत. जर गावातील लोकांना गाव सोडून बाहेर कुठेतरी जायचे असेल, तर ते हातात चप्पल किंवा बूट घेऊन जातात. गावाच्या हद्दीबाहेर गेल्यानंतर ते पायात चप्पल घालतात. गावात परत येताना देखील हाच नियम लागू होतो. गावाच्या सीमेवर आल्यानंतर लगेच पायातील चप्पल हातात येते.

चुकून भारतीय सीमेत पोहोचली पाकिस्तानी मुलं; जवानांनी दिलेली वागणूक आणि शाळा पाहून झाली भावूक

महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील येळेगाव गवळी गावात देखील एक अनोखी प्रथा आहे. या गावातील लोक आपल्या गायींचे दूध कधीही विकत नाहीत. गावातील दूधाचे मोफत वाटप केलं जातं. तसंच, नगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूरमध्ये कित्येक घरांना दरवाजे नाहीत. देशात अशी कितीतरी गावं आहेत, ज्या ठिकाणचे नागरिक आपल्या प्राचीन प्रथांचे पालन करून त्या जिवंत ठेवण्याचे काम करतात.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Tamil nadu

पुढील बातम्या