नवी दिल्ली 02 मे : संयुक्त राष्ट्राने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केल्याने भारताला मोठं यश मिळालंय. मात्र यावरून देशात राजकारणाला सुरुवात झालीय. मसूदवर घालण्यात आलेली बंदी ही चीनने घातली आहे. त्यात नरेंद्र मोदींचं काहीही श्रेय नाही असा युक्तिवाद काँग्रेसकडून करण्यात येतोय. न्यूज18 इंडियाच्या आर पार या कार्यक्रमात आज या विषयावर चर्चा झाली. भारताला मोठं यश मिळालं असताना विरोधीपक्ष यावर का नाराज आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता.
#AarPaar। मोदी की मसूद अज़हर पर 'विश्व विजय'! @AMISHDEVGAN के साथ देखें देश की सबसे बड़ी बहस #AarPaar pic.twitter.com/hZpyTVGfBU
— News18 India (@News18India) May 2, 2019
मसूद अजहरवर घालण्यात आलेली बंदी हा भारताचा विजय असला तरी त्यात फार आनंद करण्यासारखं काही नाही. आंतरराष्ट्रीय दबाव आल्याने हा चीनने हे पाऊल उचललं असा युक्तिवाद आता काँग्रेसकडून करण्यात येत आहे. नरेंद्र मोदींचा एवढाच प्रभाव आणि धमक असती तर या आधी अनेकदा हा प्रस्ताव का फेटाळण्यात आला होता याचं उत्तर सरकारने द्यावं असंही काँग्रेसने म्हटलं आहे.
#BreakingNews आंतकी मसूद अज़हर पर बहुत बड़ी ख़बर, पाकिस्तान ने भी आंतकी मसूद अज़हर पर बैन कर दिया है @AMISHDEVGAN #AarPaar pic.twitter.com/jF0T8nXNn5
— News18 India (@News18India) May 2, 2019
तर भारताचा हा मोठा विजय आहे असा दावा भाजप आणि सरकारकडून करण्यात येतोय. नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीला हे मोठं यश आलं आहे असंही सांगितलं जातंय. संयुक्त राष्ट्राच्या या निर्णयानंतर पाकिस्ताननेही मसूदवर बंदी घातली आहे. जगभरातून दबाव वाढल्याने पाकिस्तानला हा निर्णय घेण्यास भाग पडलं आहे.
#AarPaar। मोदी की मसूद अज़हर पर 'विश्व विजय'! @AMISHDEVGAN #ElectionsWithNews18 #Elections2019 pic.twitter.com/ZXanOgDEqP
— News18 India (@News18India) May 2, 2019
पण देशात लोकसभेच्या निवडणुका असल्याने या विषयावर चर्चा झाली नसती तरच नवल. हा निर्णय मोदी सरकारचा विजय असल्याचा दावा आता भाजपकडून करण्यात येत आहे. भारताचे पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवरचे हवाई हल्ले, त्यानंतरचं राजकारण, विंग कमांडर अभिनंदन याची सुटका यामुळे राजकारण तापलं आहे. त्यातच आता मसूदवर बंदी घातल्याने राजकारण तापणार असलं तरी या बंदीचा मोठा भारताला होणार आहे.
#AarPaar। मोदी की मसूद अज़हर पर 'विश्व विजय'! @AMISHDEVGAN #ElectionsWithNews18 #Elections2019 pic.twitter.com/lz3BLQFJpp
— News18 India (@News18India) May 2, 2019
मसूदला दुसरा दणका
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने देखील त्याच्यावर बंदी घातली आहे. कालच संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते.
#AarPaar। मोदी की मसूद अज़हर पर 'विश्व विजय'! @AMISHDEVGAN #ElectionsWithNews18 #Elections2019 pic.twitter.com/XfTwpLKxXH
— News18 India (@News18India) May 2, 2019
संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ला तसेच उरी आणि पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा मसूद मास्टरमाईंड होता. विशेष म्हणजे इतके दिवस या बाबत चीनने नकाधिकार वापरला होता. मात्र भारताच्या राजनैतिक रणनीतीला मोठे यश मिळाले आहे. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याने त्याची सर्व संपत्ती जप्त केली जाईल.
#AarPaar। मोदी की मसूद अज़हर पर 'विश्व विजय'! @AMISHDEVGAN #ElectionsWithNews18 #Elections2019 pic.twitter.com/tqJIfyiNAF
— News18 India (@News18India) May 2, 2019
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी भारताने दबाव टाकला होता. याला चीनने अनेकदा विरोध केला होता. यासंदर्भातील फ्रान्सच्या प्रस्तावावर चीनने व्होटोचा अधिकार वापरला होता. त्यावर अमेरिकेसह जगभरातील अन्य देशांनी चीनवर टीका देखील केली होती.