TikTok सह 52 चिनी अ‍ॅप बंद करा, गुप्तचर संस्थेची केंद्र सरकारला शिफारस

TikTok सह 52 चिनी अ‍ॅप बंद करा, गुप्तचर संस्थेची केंद्र सरकारला शिफारस

या अ‍ॅपच्या बदल्यात भारतीय बनावटीचे अ‍ॅप वापरण्याचा सल्ला गुप्तहेर संस्थांनी दिला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जून : भारत आणि चीन  नियंत्रण रेषेवरील (एलएसी) सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चीनच्या टिकटॉक आणि झूमसह जोडलेले 52 मोबाईल अ‍ॅप्स ब्लॉक करण्याची तसंच  लोकांना त्याचा वापर थांबविण्याचा सल्ला देण्याची शिफारस केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चिनी अ‍ॅप्स असुरक्षित असून भारताबाहेर भव्य डेटा पाठवत असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. यामुळे, भारतावर सायबर हल्ला देखील होण्याची शक्यता असल्याचे गुप्तहेर यंत्रणांनी म्हटलं आहे.

गुप्तचर यंत्रणेच्या वतीने केंद्र सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिकटॉक आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप झूम, यूसी ब्राउझर, शेअर इट, क्लीन मास्टर आणि झेंडर सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. एजन्सींनी दिलेल्या प्रस्तावाला राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने (एनएससीएस) पाठिंबा दर्शविला आहे.

भारतात या शहरात स्वस्त मिळतंय पेट्रोल, मुंबईपेक्षा प्रति लिटर 19 रुपयांनी दर कमी

या अ‍ॅपच्या  बदल्यात भारतीय बनावटीचे अ‍ॅप वापरण्याचा सल्ला गुप्तहेर संस्थांनी दिला आहे. एनएससीएसचा असा विश्वास आहे की, चिनी अ‍ॅप्समुळे भारताच्या सुरक्षेस धोका निर्माण होऊ शकतो. या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. सर्व मोबाइल अ‍ॅप्सच्या प्रमाणित आणि संबंधित जोखमीची तपासणी करण्यात यावी अशी देखील शिफारस करण्यात आली आहे.

यावर्षी एप्रिलमध्ये गृह मंत्रालयाने नॅशनल सायबर सिक्युरिटी एजन्सी सीईआरटी-इन (कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया) च्या प्रस्तावावर चिनी अ‍ॅप झूमच्या वापरासंबंधी एक सल्ला केंद्र सरकारने जारी केला होता. सरकारच्या अंतर्गत झूमच्या वापरावर बंदी घालणारा भारत पहिला देश नाही. यापूर्वी तैवानने सरकारी संस्थांना झूम अ‍ॅप वापरण्यास बंदी घातली होती.

'पाणी दा रंग वेख के', गिटार वाजवता वाजवता तरुण पडला गटारात, पाहा हा VIDEO

जर्मनी आणि अमेरिकेनेही तसे केले आहे. तथापि, वापरकर्त्यांनी संरक्षण देण्यासंदर्भात गंभीर असल्याचे सांगत चिनी कंपनीने गृह मंत्रालयाच्या सल्लागारवर प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, आता ज्या पद्धतीने गुप्तचर संस्थानी  स्पष्ट केले आहे की, सायबर हल्ला होण्यासाठी देखील या अ‍ॅपचा वापर होण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकार आत किती गंभीरतेने पाऊल टाकते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

First published: June 18, 2020, 4:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या