पाकला मिर्च्या झोंबल्या, बुलचिस्तानचे लोकं पंतप्रधान मोदींबद्दल म्हणाले...

पाकला मिर्च्या झोंबल्या, बुलचिस्तानचे लोकं पंतप्रधान मोदींबद्दल म्हणाले...

पाकिस्तानातल्या बलूचिस्तानातील जगभरातले नागरिक नरेंद्र मोदींचे जबरदस्त फॅन आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता पाकिस्तानमध्येही पोहोचली आहे. पाकिस्तानातल्या बलूचिस्तानातील जगभरातले नागरिक नरेंद्र मोदींचे जबरदस्त फॅन आहेत.

'गो अहेड मोदी' असा जयघोष करणारे हे नागरिक भारतीय नाहीत. तर हे पाकिस्तानातल्या बलुचिस्तानचे नागरिक आहेत. पाकिस्तानकडून होत असलेल्या अन्यायामुळे बलुचिस्तानचे नागरिक जगभरातल्या विविध देशांमध्ये स्थलांतरीत झाले.

पाकिस्तानातल्या बलुचिस्तानचे नागरिकांना आता नरेंद्र मोदीच न्याय देऊ शकतील असा त्यांना विश्वास वाटतो. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पोस्टर हाती घेऊन जर्मनीत, थँक यू इंडिया अशी कृतज्ञता व्यक्त केली जातेय.

बलुचिस्तानचे नागरिक पाकिस्तानच्या अन्यायाविरोधात एकजूट होऊ लागले आहे. ( पाकिस्तान टेररिस्ट, इस्लामिक रिपब्लिक टेररिस्ट पाकिस्तान) बलुचि नागरिकांचा आवाज आता जगभरात पोहोचला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा पुन्हा फाटला आहे. आपल्याच देशातल्या नागरिकांवर अन्याय करणाऱ्या पाकिस्तानचा क्रूर चेहरा पुन्हा जगासमोर उघड झाला.

===============

Published by: sachin Salve
First published: November 19, 2019, 11:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading