सामंत गोयल बनले नवे रॉ प्रमुख, काय आहे त्यांचं बालाकोट एअर स्ट्राइक कनेक्शन?

मोदी सरकारने आयपीएस सामंत गोयल यांची रॉ म्हणजेच रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंगच्या प्रमुखपदी नेमणूक केली आहे. सामंत गोयल यांनीच 26 फेब्रुवारीच्या बालाकोट एअर स्ट्राइकचं नियोजन केलं होतं. गोयल हे पंजाब कॅडरचे 1984 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

Arti Kulkarni | News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 04:02 PM IST

सामंत गोयल बनले नवे रॉ प्रमुख, काय आहे त्यांचं बालाकोट एअर स्ट्राइक कनेक्शन?

नवी दिल्ली, 26 जून : मोदी सरकारने आयपीएस सामंत गोयल यांची रॉ (RAW) म्हणजेच रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंगच्या प्रमुखपदी नेमणूक केली आहे. सामंत गोयल यांनीच 26 फेब्रुवारीच्या बालाकोट एअर स्ट्राइकचं (AIR STRIKE) नियोजन केलं होतं. गोयल हे पंजाब कॅडरचे 1984 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

रॉ चे प्रमुख अनिल कुमार धस्माना निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी सामंत गोयल यांची नियुक्ती झाली आहे. एअर स्ट्राइकची कामगिरी यशस्वी केल्यामुळे आता सामंत गोयल हे रॉ ची धुरा यशस्वीपणे सांभाळतील, असा विश्वास मोदी सरकारला आहे. पुलवाना हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राइक केला होता. यामध्ये दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं होतं.

कोण आहेत सामंत गोयल ?

सामंत गोयल यांचा जन्म 13 जून 1960 चा. वयाच्या 24 व्या वर्षी ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात होशियारपूर जिल्ह्यात गढशंकरमध्ये केली. त्यानंतर ते फिरोजपूर, गुरुदासपूर आणि अमृतसरचे एसपी होते.

निजामाचे 8 कोटी कोणाला मिळणार? पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत भारताचे पारडे जड!

Loading...

भारत सरकारच्या सेवेत गोयल यांची पहिली नियुक्ती 2001 मध्ये झाली. कॅबिनेट सचिवायलयामध्ये काम केल्यानंतर ते गुप्तचर यंत्रणांचं मॉनिटरिंग करत होते. पंजाब पोलीस खात्याचे महासंचालक असताना गोयल यांनी सीमा व्यवस्थापन आणि गुप्तवार्ता विभागाची धुराही सांभाळली होती. आयबी आणि रॉ या दोन्ही यंत्रणांमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.

पोलीस मेडलने गौरव

सामंत गोयल यांना 1995 आणि 2000 साली उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस मेडलही मिळालं आहे. बालाकोट एअर स्ट्राइकचं पूर्ण नियोजन त्यांच्या करिअरमधली सर्वोच्च कामगिरी आहे.आता त्यांच्याकडे रॉ ची धुरा सोपवण्यात आल्यामुळे इथेही ते सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास मोदी सरकारला आहे.

===================================================================================================

दाभोलकर हत्येप्रकरणी मोठा खुलासा; सीबीआयकडून विशेष कोर्टात अहवाल सादर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 03:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...