नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: जम्मू-काश्मीरमध्ये फेब्रुवारी महिन्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत पाकिस्तान आणि जौश-ए-मोहम्मदला थडा शिकवला होता. आता या ठिकाणी पुन्हा एकदा दहशतवादी हलचाली सुरु झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कमल 370 हटवल्यानंतर पाक अस्वस्थ झाला आहे. पाकने अनेक वेळा थेट भारताला हल्ल्याची धमकी दिली आहे. बालाकोट येथे पुन्हा दहशतवादी सक्रिय झाल्यावर लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.
Army Chief General Bipin Rawat: Balakot has been re-activated by Pakistan, very recently. This shows Balakot was affected, it was damaged; it highlights some action was taken by the Indian Air Force at Balakot & now they have got the people back there. pic.twitter.com/IFN7SjJDud
— ANI (@ANI) September 23, 2019
भारतीय जवान सीमेवर उभे आहेत. यापुढे जर दहशतवादी हल्ले झाले तर भारतीय सेना बालाकोटच्या पुढे जाऊ शकते. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार कमीत कमी 500 दहशतवादी पाक व्याप्त काश्मीरमधून घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने जाहीरपणे सांगितले होते की आम्ही दहशतवादी पाठवू. त्यामुळेच त्यांच्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंखन केले जात आहे. एका बाजूला गोळीबार करून भारतीय लष्कराचे लक्ष वेधायचे आणि त्याच वेळी दहशतवाद्यांनी सीमेवरून भारतीय हद्दीत प्रवेश करायला लावायचा हेच पाकिस्तानचे धोरण असल्याचे रावत यांनी सांगितले.
जनरल रावत यांनी असे देखील सांगितले की, इस्लामचा गैरवापर केला जात आहे. धर्मगुरुंनी इस्लामचा योग्य अर्थ समजावून सांगावा. काही असे लोक आहेत जे इस्लामचा चुकीचा अर्थ काढत आहेत. यामुळे हिंसक वातावरण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत मला वाटते की जे धर्मगुरु आहेत त्यांनी इस्लामचा खरा अर्थ सांगावा.
बालाकोट येथे जैशेचा कॅम्प पुन्हा सुरु
बालाकोट येथील दहशतवादी कॅम्प पुन्हा एकदा सुरु झाला आहे. येथे 500 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याची माहिती आहे. हे सर्व दहशतवादी काश्मीरमध्ये हल्ला करण्यासाठी घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. पाकिस्तानने POKमधील लॉन्च पॅड देखील पुन्हा सक्रिय केला आहे. पण भारतीय लष्कर दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यास सक्षम असल्याचे रावत यांनी स्पष्ट केले. भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानमधील अनेक कॅम्प बंद झाले होते.