बकरी ईदसाठी तुम्ही घरबसल्या मागवू शकता बकरा, ही आहे ट्रिक

तुम्ही बकऱ्याची ऑनलाइन ऑर्डर दिलीत की तो बकरा जिवंत तुमच्या घरी हजर केला जातो. मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर बुकिंग केलं की काही वेळातच बकरा तुमच्या दारात येतो. त्यावेळी होम डिलिव्हरी करणारा म्हणू शकतो, साहेब, तुमचा बकरा आला!

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 08:25 PM IST

बकरी ईदसाठी तुम्ही घरबसल्या मागवू शकता बकरा, ही आहे ट्रिक

मुंबई, 10 ऑगस्ट : बकरी ईदच्या निमित्ताने बकऱ्यांची मागणी वाढली आहे. त्यातच आता जिवंत बकऱ्यांची होम डिलिव्हरी केली जातेय. या होम डिलिव्हरीच्या बकऱ्यांची सगळी माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे. तुम्हाला एखादा बकरा हवा असेल तर त्याची उंची, वजन, रंग, किंमत अशी सगळी माहिती ऑनलाइन पाहता येते.

ऑनलाइन बकऱ्यांची खरेदी करण्यासाठी तरुणवर्ग खूपच उत्सुक आहे. तुम्ही बकऱ्याची ऑनलाइन ऑर्डर दिलीत की तो बकरा जिवंत तुमच्या घरी हजर केला जातो. मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर बुकिंग केलं की काही वेळातच बकरा तुमच्या दारात येतो. त्यावेळी होम डिलिव्हरी करणारा म्हणू शकतो, साहेब, तुमचा बकरा आला!

वीज कोसळल्यामुळे 15 खेळाडू जखमी, खुल्या मैदानात करत होते सराव

बकऱ्यांच्या या ऑनलाइन विक्रीवर संमिश्र प्रतिक्रिया मिळतायत. काहीजण दारात बकरा मिळणार असल्यामुळे खूश आहेत तर काहीजणांना मात्र बकऱ्याची निवड ऑनलाईन करणं तेवढं पसंत नाही. बकऱ्याची कुर्बानी द्यायची असल्यामुळे तो पारखूनच घेतला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे.

बकऱ्यांचा व्यापार करणारे व्यापारी मात्र यामुळे काहिसे नाखुश आहेत. ऑनलाइन व्यवहारामुळे आमचं नुकसान होईल, अशी त्यांची तक्रार आहे.

Loading...

Video:कमाल! पायलट बनायचं होतं म्हणून टाटा नॅनोचं बनवलं हेलिकॉप्टर

बकरी ईदनिमित्त लोक लाखलाख रुपयांचे बकरे विकत घेतात. एखाद्या कारचीही एवढी किंमत नसेल एवढी आता बकऱ्यांची झाली आहे. अशा महागड्या बकऱ्यांना एसीमध्ये ठेवलं जातं आणि त्यांची देखभाल अगदी मुलांसारखी केलेली असते. या बकऱ्यांना भरपूर मागणी आहे. प्रत्येक सणाचा इव्हेंट करण्याच्या या जमान्यात आता असे महागडे बकरे हप्त्यावरच घ्यावे लागतील, असंही काहीजणांचं म्हणणं आहे.

===================================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 08:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...