• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • बेकरी व्यावसायिकानं घडवली इको फ्रेंडली मूर्ती; चॉकलेटचा गणपती ठरतोय आकर्षण

बेकरी व्यावसायिकानं घडवली इको फ्रेंडली मूर्ती; चॉकलेटचा गणपती ठरतोय आकर्षण

Chocolate Ganpati: पंजाबमधील लुधियाना येथील एका बेकरी व्यावसायिकानं चक्क चॉकलेटचा गणपती साकारला आहे. हा गणपती इको फ्रेंडली असून गणेश भक्तांचं आकर्षण ठरत आहेत.

 • Share this:
  लुधियाना, 10 सप्टेंबर: कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या गणेशोत्सवावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाकडून विविध पावलं उचलली जात आहे. कोरोना नियमांचं पालन करत सण उत्सव कसे साजरे करता येतील, या अनुषंगाने प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येत आहेत. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी अनेक मोठ्या गणेश मंडळाच्या गणपतीचं ऑनलाइन दर्शन घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच गणेशोत्सवाच्या काळात प्रदूषण टाळण्यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अशात पंजाबमधील लुधियाना येथील एका बेकरी व्यावसायिकानं चक्क चॉकलेटचा गणपती साकारला आहे. हा गणपती इको फ्रेंडली असून गणेश भक्तांचं आकर्षण ठरत आहेत. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर त्यांनी हा गणपती साकारल्यानं अनेक भाविक संबंधित बेकरीत गणपती पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. हरजिंदर सिंह कुकरेजा असं संबंधित बेकरी व्यावसायिकाचं नाव असून त्यांच्या एका बेकरी कारागिरानं हा चॉकलेटचा गणपती साकारला आहे. हेही वाचा-श्रीमंत दगडूशेठ गणपती अवतरणार आपल्या घरी, कसा? त्यासाठी करा येथे Click यावेळी बेकरी व्यावसायिक कुकरेजा यांनी सांगितलं की, ते मागील 6 वर्षांपासून चॉकलेटचा गणपती बनवत आहे. इको फ्रेंडली पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला जाऊ शकतो, असा संदेश आम्हाला यातून द्यायचा असल्याचं कुकरेजा यांनी सांगितलं आहे. तसेच पर्यावरणाला हाणी ठरणाऱ्या गणेश मूर्तींचा कमीत कमी वापर करावा, असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: