कर्नाटक, 23 फेब्रुवारी: कर्नाटकातील (Karnataka) शिमोग्गा जिल्ह्यातील (Shivamogga District) बजरंग दलाचा कार्यकर्ता (Bajrang Dal Worker) हर्षाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी काही जणांना अटक केली आहे. आताप्रकरणी या हत्येशी संबंधित 8 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
शिमोग्गा एसपी लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितलं की, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. आसिफ, सय्यद नदीम, रेहान शरीफ, निहान, अब्दुल अफनान आणि काशिफ अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एकूण 12 जणांची चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांनी सांगितलं की, या हत्येमध्ये सहभागी असलेल्या 8 आरोपींचे वय 20 ते 22 दरम्यान आहे.
20 फेब्रुवारीला हर्षाची हत्या करण्यात आली होती. हर्षाच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांनी आरोप केला होता की, तो बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे म्हणून काही बदमाशांनी त्याची हत्या केली आहे.
हत्येनंतर शहरात निदर्शने
हर्षाच्या मृत्यूनंतर शिमोग्गासह संपूर्ण कर्नाटकात निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक, शस्त्रांचा वापर केला आणि वाहनांची जाळपोळही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.
शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर
या घटनेनंतर तणावाचे वातावरण पाहता जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. याशिवाय येथे कलम 144 लागू करण्यात आल आहे. संचारबंदीही लागू केली असून आता ती शुक्रवारपर्यंत वाढवण्यात आली आहे.
मोठी बातमी: आता 2 ते 6 वर्षांच्या मुलांना लवकरच मिळणार Coronaची लस
अधिकाऱ्यानं सांगितलं की, शहरात हिंसाचार आणि जाळपोळीच्या 14 वेगवेगळ्या घटना घडल्या (हत्येनंतर) ज्यासाठी एफआयआर दाखल केला जाईल. या घडामोडीनंतर, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होतं की, तीन प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस जाळपोळ आणि हिंसाचारात वाहने आणि मालमत्तेचं नुकसान झालेल्यांचा शोध घेत आहेत.
शिमोग्गामध्ये वाढवला कर्फ्यू
आरोपींच्या अटकेनंतरही शिमोग्गामध्ये संचारबंदी वाढवण्यात आली आहे. आता येथे फक्त सकाळी 6 ते 9 या वेळेतच हालचाली होतील. त्याचबरोबर कलम 144 देखील दोन दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. शिमोग्गा उपायुक्त डॉ. सेल्वामणी आर म्हणाले की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्फ्यूचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.