• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Watch Video: बजरंग दल आक्रमक, भररस्त्यात जाळलं 'कामसूत्र' पुस्तक

Watch Video: बजरंग दल आक्रमक, भररस्त्यात जाळलं 'कामसूत्र' पुस्तक

बजरंग दलानं (Bajrang Dal) भारताचं प्राचीन पुस्तक कामसूत्र (Kamsutra marathi news) जाळलं आहे.

 • Share this:
  गांधीनगर, 30 ऑगस्ट: बजरंग दलानं (Bajrang Dal) भारताचं प्राचीन पुस्तक कामसूत्र (Kamsutra marathi news) जाळलं आहे. गुजरातमधील (Gujrat bajrang dal) अहमदाबादमध्ये ही घटना घडली आहे. बजरंग दलानं असा आरोप केला आहे की, हे पुस्तक हिंदू देवी-देवतांना अश्लील रुपात दाखवलं असून त्यांचा अपमान केला आहे. बजरंग दलानं आक्रमक पवित्रा घेत पुस्तक दुकानदाराला देखील धमकी दिली आहे. पुन्हा या पुस्तकाची विक्री केल्यास दुकानालाच आग लावू असं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये बजरंग दलाचा आक्रमक पवित्रा लॅटीट्युट नावाचं पुस्तकाचं दुकान अहमदाबादमधल्या एसजी महामार्गावर आहे. या दुकानाच्या बजरंग दलाचा स्थानिक संयोजक जवलित मेहता यानं कामसूत्र पुस्तकाची एक प्रत पेटवली. यावेळी तो म्हणाला की, या पुस्तकात कामसूत्राच्या नावाखाली हिंदू देवी-देवतांच्या फोटोंचा चुकीचा वापर करण्यात आला आहे. आम्ही हे पुस्तक दुकानाच्या बाहेरचं जाळलं. मात्र त्यानंतरही या पुस्तकाची विक्री सुरुच राहिली तर पुढच्या वेळी दुकानासोबत सर्व पुस्तकं जाळून टाकू.
  Published by:Pooja Vichare
  First published: