'आधार कार्ड शिवाय गरबा आणि दांडियासाठी प्रवेश देऊ नका'

नवरात्रोत्सवाच्या काळात खेळल्या जाणाऱ्या गरबा आणि दांडिया आयोजकांसाठी बजरंग दलाने एक आदेशवजा फतवा काढला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 12:58 PM IST

'आधार कार्ड शिवाय गरबा आणि दांडियासाठी प्रवेश देऊ नका'

हैदराबाद, 29 सप्टेंबर: नवरात्रोत्सवाच्या काळात खेळल्या जाणाऱ्या गरबा आणि दांडिया आयोजकांसाठी बजरंग दलाने एक आदेशवजा फतवा काढला आहे. ज्या ठिकाणी गरबा किंवा दांडियाचे आयोजन करण्यात येईल तेथे आधार कार्ड शिवाय प्रवेश देऊ नये. अशा प्रकारे आधार कार्ड सक्ती करण्यामागे गैर हिंदू लोकांनी या कार्यक्रमांना येऊ नये असा असल्याचे बजरंग दलाने म्हटले आहे. आधार कार्ड सक्तीमुळे गैर हिंदू लोक कोण आहेत हे समजू शकले.

बजरंग दलाने सर्व आयोजकांसाठी एक खुले पत्र लिहले आहे. या पत्रातून असा दावा करण्यात आला आहे की, गेल्या काही वर्षापासून नवरात्रोत्सवात गरबा आणि दिंडिया सारख्या कार्यक्रमात गैर हिंदू युवक प्रवेश करतात. असे युवक महिलांसोबत गैरवर्तन करतात. इतक नव्हे तर जे लोक महिलांनाच्या बचावासाठी येतात त्यांना हे गैर हिंदू युवक मारहाण देखील करता. त्यामुळेच आधार कार्ड पाहिल्यानंतरच कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश द्यावा, असे या पत्रात म्हटले आहे.

Navratri 2019 : नवरात्रीचे नऊ रंग नेमके ठरतात कसे? घ्या जाणून

काही आयोजक गैर हिंदू बाऊसर्सना आयोजनाच्या ठिकाणी कामावर ठेवतात. यामुळे कार्यक्रमात चुकीचे लोक प्रवेश करतात. कार्यक्रमाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा आणि नियंत्रण ठेवले जात नसल्याचे बजरंग दलाने म्हटले आहे.

काश्मीरमधील ओसामा ठार; महिला कमांडरने केली कारवाई, ऑपरेशनचा VIDEO समोर

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 12:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...