S M L

बजाज इलेक्ट्रिकल्सनं विकत घेतली निर्लेप अप्लायन्स कंपनी

घराघरात पोहोचलेली कंपनी निर्लेप अखेर बजाज इलेक्ट्रिकल्सनं विकत घेण्याचा निर्णय घेतलाय.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 16, 2018 01:14 PM IST

बजाज इलेक्ट्रिकल्सनं विकत घेतली निर्लेप अप्लायन्स कंपनी

मुंबई, 16 जून : घराघरात पोहोचलेली कंपनी निर्लेप अखेर बजाज इलेक्ट्रिकल्सनं विकत घेण्याचा निर्णय घेतलाय. एकूण 80 कोटींचा हा करार आहे.

बजाजनं निर्लेपचं मूल्यांकन जवळपास 42 कोटी 50 लाख एवढं केलंय. कंपनीवर 30 कोटी कर्ज आहे. काही रक्कम थकीत आहे आणि 500 कर्मचारी आहेत. पुढच्या 6 महिन्यात हा करार पूर्ण केला जाईल.

गेल्या 10 वर्षांपासून निर्लेपचं व्यावस्थापन गुंतवणूकदारांच्या शोधात होतं. काही विदेशी गुंतवणूकदारही आले होते, पण शक्यतोवर भारतीय कंपनीला कंपनी विकण्याची निर्लेपच्या मालकांची इच्छा होती. विशेष म्हणजे यंदा निर्लेपचं सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

मराठमोळी निर्लेप कंपनी बजाजकडे

- स्थापना - 1968

- संचालक - राम भोगले

- कर्मचारी - 500

- वितरक - 86

- किरकोळ विक्रेते - 12 हजार

- भारतात पहिल्यांदा नॉनस्टिक तवे आणले

- प. आशिया, आफ्रिका खंड आणि श्रीलंकेत व्यवसाय

- युरोपमध्येही वापरली जातात उत्पादनं

- मूल्यांकन - 42.50 कोटी

- कर्ज - 30 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2018 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close